आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीलेश भील अपहरण प्रकरणाला वेगळे वळण, पैशांचा पाऊस पाडणारा मांत्रीक बाबा पोलिसांच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर- राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश भील व त्याचा लहान भाऊ सात दिवसांपासून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेवूनही त्यांचा थांगपत्ता नाही. अशातच मुक्ताईनगर, बोदवड पोलिसांनी बुधवारी (दि.२४) मध्यरात्री माळेगाव (ता.मुक्ताईनगर) येथील पैशांचा पाऊस पाडल्याने मध्यंतरी चर्चेत आलेला मांत्रिक आदेशबाबाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या घरातील भूमीगत खोलीत पूजेचे साहित्य, चाकू-सुरा आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल आढले असून, या प्रकरणाला काही वेगळे कंगोरे असण्याची शक्यता वाढली आहे.

तालुक्यातील कोथळी येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश रेवाराम भील (वय १२) आणि त्याचा सात वर्षीय भाऊ गणपत हे दोघे १९ मे पासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असून चार पोलिस पथकांनी भुसावळ, वरणगाव रेल्वे, बसस्थानक तसेच श्वानपथकाद्वारे मुक्ताईनगर तालुक्यातील वनक्षेत्रात कसून शोध घेतला. मात्र, नीलेश व गणपतचा सुगावा लागलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी मक्ताईनगर व बोदवड पोलिसांनी बुधवारी रात्री माळेगाव (ता.मुक्ताईनगर) येथील आदेशबाबा (वय ४५) नामक चर्चेतील चेहऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुरुवारी देखील आदेशबाबाची चौकशी झाल्याच्या वृत्तास पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी दुजोरा दिला. 

दरम्यान, माळेगावातील रहिवासी असलेला आदेशबाबा सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी पैशांचा पाऊस पाडल्याच्या दाव्यावरून संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आला होता. आता नीलेशचे अपहरण प्रकरण गाजत असताना पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने काही धक्कादायक माहिती समोर येते का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. निरीक्षक कडलग, उपनिरीक्षक वंदना सोनुने, सचिन इंगळे, हवालदार संतोष नागरे, कांतीलाल केदारे आदींनी कोणासही सुगावा लागू न देता ही कारवाई केली.

संशयाचे वलय... 
मुक्ताईनर व बोदवड पोलिसांनी गुरुवारी पहाटे दीड वाजता अचानक माळेगाव गाठून आदेशबाबाला ताब्यात घेतले. या वेळी केलेल्या तपासणीत त्याच्या घरात एक भूमीगत खोली आढळली. या खोलीमध्ये पुजेचे साहित्य, सुरा, तलवारसदृश्य लांब चाकू, ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल गवसले. या वेळी इतर दोन ते तीन जण आदेशबाबाकडे उपस्थित होते. त्यांचीही माहिती घेत आहोत, असे पोलिस निरीक्षक कडलग यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...