आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

43 दिवसांनंतर अाज वाजणार शाळांची घंटा, मिरवणुकीनंतर मुलांच्या हातात मिळणार पुस्तके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
भुसावळ - नवीन शैक्षणिक वर्ष गुरुवार (दि.१५) पासून सुरू हाेत आहे. यामुळे उन्हाळी सुट्या संपल्यावर तब्बल ४३ दिवसांनंतर शाळांची घंटा वाजणार आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके देऊन स्वागत होईल. यानंतर वाजत गाजत विद्यार्थ्यांची मिरवणूक निघेल. तद््नंतर विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून पुस्तकांचे वाटप करण्यात येईल. 
 
गेल्या 2 मे राेजी शाळांना सुटी लागली होती. यानंतर गुरूवारी (दि.१५) यंदाच्या वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू होत असून गुरुवारी सकाळी ६.५० वाजेपासून शाळांचे आवार पुन्हा एकदा मुलांच्या गर्दीने फुलेल. जिल्हा परिषद शाळांमध्येही पहिला दिवस खास ठरले. यासाठी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेत पहिल्या दिवसाचे नियोजन केले आहे. दरम्यान, शहर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये बुधवारी साफसफाई, तर काही शाळांमध्ये रंगरंगोटीची कामे उरकण्यात आली. 
 
२८ हजार विद्यार्थी 
शाळेच्यापहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवीन पुस्तके दिली जाणार अाहे. शिक्षणाची गाेडी पहिल्या दिवसापासून लागावी यासाठी शिक्षण विभागाने हे नियाेजन केले अाहे. अाले अाहे. मराठी, इंग्रजी, हिंदी अाणि उर्दू माध्यमाची ही पुस्तके आहेत. दरम्यान, यंदा सातवीचा नवीन अभ्यासक्रम अाहे. 
 
पथक तयार केले 
- शाळेच्या पहिल्याच दिवशी पंचायत समितीचे सभापती, शिक्षण विभागातील अधिकारी अाणि केंद्रप्रमुखांचे पथक तयार केलेे अाहे. ही मंडळी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत पुस्तकांचे वितरण करतील. पालकांनी उपस्थित राहावे.
विजय पवार, गटशिक्षणाधिकारी 
बातम्या आणखी आहेत...