आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200च्या नोटांसाठी महिनाभर प्रतीक्षा, रिझर्व्ह बँकेकडून वितरण नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ५० आणि २०० रूपयांच्या नव्या नोटांच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगावकरांना आणखी एक महिना वाट पहावी लागणार आहे, असे संकेत भारतीय स्टेट बँकेने दिले आहेत. नोटांच्या तुटवड्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून जिल्ह्यातील बँकांना नव्या नोटांचे वितरण करण्यात आलेले नाही. 
 
रिझर्व्ह बँकेने आठ दिवसांपूर्वी ५० आणि २०० रूपयांची नवी नोट प्रकाशित केली आणि त्याच दिवशी ती बाजारात वितरीत केली. मात्र, सुरूवातीला मेट्रो सिटींमध्येच नव्या नोटा वितरीत करण्यात आल्या आहेत. सध्या ५० कोटी नव्या नोटांची छपाई झालेली असून उर्वरित छपाईचे सुरू आहे; मात्र, गेल्या काही दिवसांपासून जळगावकर नव्या नोटेच्या प्रतिक्षेत आहेत. शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत अनेक ग्राहकांकडून नव्या नाेटाविषयी विचारणा केली जात आहे. पण, अजून एक महिना तरी नागरिकांना प्रतिक्षा करावी लागेल, अशी माहिती स्टेट बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक एस.वी. गिरियन् यांनी दिली. रिझर्व्ह बँकेकडून जिल्ह्यासाठी होणाऱ्या नोटांचे वितरण स्टेट बँकेच्या मुख्य शाखेकडे केले जाते. त्यानंतर जिल्ह्यातील इतर बँकांना स्टेट बँक नोटांचा पुरवठा करते. 
 
 
सेव्हिंगचे व्याजदर अर्ध्या टक्क्यांनी कमी 
नोट बंदीनंतर बँकांमध्ये रकमेचा भरणा वाढला आहे. त्यातुलनेत स्टेट बँकेतील रकमेचा भरणा मोठा आहे. त्यामुळे स्टेट बँकेने सेव्हिंग खात्यावरील व्याजदर अर्ध्या टक्क्याने कमी केले आहेत. सेव्हिंगवर चार टक्के व्याज दर मिळत होते. आता ते साडेतीन टक्के करण्यात आले आहेत. व्याजदर कमी करण्यासंदर्भातील निर्णय आरबीआयने संबधित बँकांवर सोपवला आहे. त्यानुसार एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. नोट बंदीपूर्वी शून्य बॅलन्स असलेल्या जनधनच्या खात्यांमध्येही पैसे असल्याचे चित्र आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...