आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे : न्यू कुणाल बिअरबारसमोर महिलांची भजने; एक्साइजचे अधिकारी दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नकाणे रोडवरील बिअरबार समोर भजने म्हणताना प्रमोदनगर परिसरातील महिला. हा बिअरबार बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. त्यासाठी निवेदनेही दिली आहेत. - Divya Marathi
नकाणे रोडवरील बिअरबार समोर भजने म्हणताना प्रमोदनगर परिसरातील महिला. हा बिअरबार बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. त्यासाठी निवेदनेही दिली आहेत.
धुळे - नकाणे राेडवरील प्रमाेदनगर सेक्टरमधील नालंदा ग्रुपचे न्यू कुणाल बिअरबार बंद करावे यासाठी स्थानिक नागरिकांसह महिलांनी संघर्षाचा पवित्रा घेतला अाहे. त्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी या बिअरबारसमाेर महिलांनी भजन अांदाेलन केले. तर उद्या गुरुवारपासून सह्यांची माेहीम राबविण्यात येणार अाहे. या बारसमाेर बाहेर महिला भजने म्हणत असताना उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन बारमधील मद्यसाठ्याची माेजणी केली. 
नकाणे राेडवरील बिअरबारमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत अाहे.
 
महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले अाहे. त्याविराेधात महिलांनी अांदाेलन छेडले. यासंदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पाेलिस अधीक्षक अादींना निवेदन दिले गेले. तसेच मंगळवारपासून बिअरबारसमाेर महिलांचे भजन अांदाेलन होत आहे. रात्री हे अांदाेलन केले जाते. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सात वाजेपासून परिसरातील महिलांकडून नगरसेविका वैभवी दुसाने यांच्यासह भजन अांदाेलन करण्यात अाले. त्यात नगरसेविका प्रतिभा चाैधरी, नगरसेवक कमलेश देवरे, परिसरातील महिला, युवकांनी सहभाग नाेंदविला. भजन अांदाेलनाची दखल घेऊन रात्री अाठ वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली. तसेच अांदाेलन करणाऱ्या महिलांबराेबर चर्चा केली. त्या वेळी महिलांंनी तीव्र भावना व्यक्त केल्या तसेच बार बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर संबंधित कर्मचारी बारमध्ये गेले. त्यांनी दरवाजा बंद करून कारवाई सुरू केली. एक तासानंतरही अधिकारी बाहेर अाल्याने अांदाेलनकर्त्यांनी संशय व्यक्त केला. त्यानंतर संबंधितांकडून बारमध्ये असलेला साठा, विक्री केेलेल्या साठ्याची नाेंद घेत असल्याचे सांगण्यात अाले. रात्री नऊ वाजेपर्यंत अांदाेलन सुरू हाेते. त्यानंतर महिला परतल्या. या वेळी झालेल्या निर्णयानुसार या बार विराेधात उद्या गुरुवारपासून सह्यांची माेहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. घराेघरी जाऊन महिलांच्या सह्या घेतल्या जातील. महिलांच्या या आंदोलनामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या परिसरात नवीन दुकाने सुरू करण्याची तयारी होत आहे. त्यापैकी प्रिंस या दारूच्या दुकानासमोर याच महिलांनी आंदोलन केले होते. त्यामुळे ते अद्याप सुरू झाले नाही. 
 
दोन नवीन मद्याच्या दुकानांचा घाट 
या दुकानापासून काही अंतरावर असलेल्या मंगल कार्यालयाजवळ नवीन मद्याचे दुकान सुरू करण्याचे प्रयत्न सुरू अाहेत. याशिवाय इतरही काही जुने दुकाने या भागात स्थलांतर हाेणार अाहेत. त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या अाहेत. त्यांच्या विराेधात परिसरातील नागरिकांनी सह्या करून विराेध नाेंदवला जाणार आहे. 
 
पाचकंदील जवळील सागर बिअरबारमधील मद्यसाठ्यावर छापा 
शहरातील पाच कंदील परिसरातील चैनी राेडवरील सागर बिअरबारवर पाेलिसांनी छापा टाकत ७० हजारांचा मद्यसाठा जप्त केला. सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशाचे उल्लंघन करून या हाॅटेलमध्ये खुलेअाम मद्यविक्री सुरू हाेती. महामार्गापासून पाचशे मीटर अंतरात मद्यविक्रीला बंदी घालण्यात अाली. मात्र, सागर बिअरबारवर याच नियमाला धाब्यावर बसवत ग्राहकांना मद्य पुरविले जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानंतर अप्पर पाेलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या पथकाने छापा टाकला. कारवाईनंतर बिअरबार मालक मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
 
पथकाने केलेल्या कारवाईत ७० हजार रुपये िकमतीचा देशी-विदेशी दारू, बिअर, वाेडका अादी मुद्देमाल जप्त केला. अचानक रात्री झालेल्या कारवाईनंतर या ठिकाणी उपस्थित काही ग्राहकांनी पळ काढला. पथकाकडून कारवाई करीत मुद्देमाल जप्त करून पाेलिस ठाण्यात जमा करण्यात अाला अाहे. याप्रकरणी हाॅटेल सागरचे मालक संताेष गाेपालदास जयस्वाल (५२) अाणि तेथे काउंटरवर असलेला हेमंत रमेश सातभाई (रा. माेहाडी) या दाेघांविरुद्ध अाझादनगर पाेलिस ठाण्यात प्राेव्हिशन अॅक्ट ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...