आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन विद्यापीठ कायद्याच्या चर्चेसाठी उद्या मुंबईला बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नवीन विद्यापीठ कायदा हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात आला आहे. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आता हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानिमित्ताने मार्च रोजी मुंबई येथे कुलपतींकडे राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक आयोजित केली आहे. 
 
नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी मार्च पासून होईल अशी माहिती फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती. मात्र, मार्च पर्यंत राजभवनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना नव्हत्या. अखेर मार्च रोजी कुलपती कार्यालयात या संदर्भात राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव कायदा अधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर बहुदा मार्च पासून नवीन कायदा अस्तीत्वात येण्याची दाट शक्यता आहे.
 
विद्यार्थी हिताच्या दृष्टीने तसेच आगामी काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा नवीन कायदा महत्वपूर्ण ठरणारा आहे. अभ्यासक्रम, विषयांना शिकवण्याची पद्धत यात अमुलाग्र बदल केला आहे. शिक्षकांनी अपडेट रहावे यासाठी त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींची काटेकोर पुर्तता करण्याचे आव्हान आता विद्यापीठांना पेलावे लागणार आहे. 
 
रोजी कुलसचिव पदासाठी मुलाखती 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी मार्च रोजी मुलाखतींचे आयोजन केलेे आहे. तात्कालिन कुलसचिव डॉ.ए.एम.महाजन यांचा कार्यकाळ जानेवारी रोजी संपला आहे. त्यानंतर प्रभारी कुलसचिवपदी डॉ.ए.बी.चौधरी यांनी तात्पूर्ती नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान कुलसचिव पदासाठी एकुण १६ अर्ज आले असून त्यांना मार्च रोजी मुलाखतीला बोलावण्यात आले आहे. 

तिजोरीवर पडणार ताण 
नवीन विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीवर विद्यापीठांसह शासनाच्या तिजोरीवर चांगलाच ताण पडणार आहे. नवीन पदांची निर्मिती होणार असल्यामुळे त्यांचे वेतन, इतर सुविधा तसेच नविन इमारतींचे बांधकामे करावी लागणार आहेत. टप्प्या-टप्प्याने हे बदल विद्यापीठांना करावे लागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही या बाबी विचारात येणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प तयार करणाऱ्या समितीची चांगलीच दमछाकही झाली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...