आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठामध्ये लवकरच योगविषयक अभ्यासक्रम, कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी दिली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - परीक्षांचा ताण, वाढती स्पर्धा, अनियमित दिनचर्या यामुळे तरुणाई निराशेच्या गर्तेत लोटली जात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी योग साधनेशिवाय पर्याय नाही, वसतिगृहातील विद्यार्थिनी घरापासून लांब राहात असल्यामुळे त्यांच्यात अनेकदा एकटेपणा जाणवतो. हा ताणतणाव दूर करण्यासाठी विद्यापीठाने दोन महिन्याचे योग शिबिर आयोजित केले आहे. तसेच विद्यापीठ लवकरच योग विषयक अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी दिली. 
 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मूळजी जेठा महाविद्यालयातील योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी योग शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी कुलगुरू प्रा. पाटील बोलत होते. नियमितपणे योगा केल्यास कार्यक्षमता वाढते, असेही ते म्हणाले.
 
फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत हे योग शिबिर होईल. या वेळी मंचावर मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, बीसीयूडी संचालक प्रा. पी. पी. माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा. ए. बी. चौधरी, योग विभागप्रमुख प्रा. आरती गोरे, प्रा. रत्नामाला बेंद्रे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. देवानंद सोनार यांनी केले. डॉ. रत्नमाला बेंद्रे यांनी आभार मानले. 
 
सकाळी ते या वेळात योगाचे मार्गदर्शन 
योग शिक्षिका गीतांजली भंगाळे, रत्नप्रभा चौधरी, तृप्ती बोरोले, शिबिर समन्वयक मीनाक्षी पाटील या दररोज विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. दोन महिन्यांच्या काळात सकाळी ते या वेळेत हे शिबिर घेतले जाणार आहे.
 
यशस्वितेसाठी अभियंता राजेश पाटील, प्रा. पंकज खाजबागे, प्रा. लीना चौधरी, प्रा. ज्योती वाघ, रश्मी घासकडबी, स्मिता सांगळे, पूनम खोडपे, रूपाली वरवटे, पल्लवी देशमुख आदींनी सहकार्य केले.
बातम्या आणखी आहेत...