आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनो, पद, पैसा, प्रतिष्ठेच्या मोहात पडता ध्येय साध्य करा- वृत्तसंपादिका ज्याेती आंबेकर यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आताची पिढी अॅक्टिव्ह आहे. तिच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एकदा का यायला लागले की, पद, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी चालून येतात. मात्र, तरुणांनी या गोष्टींच्या मोहात पडता आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. अनेक जण या मोहात गुरफटून स्वत:चा विकास थांबवून घेतात. त्यामुळे तरुणांनी आपल्यातील कौशल्ये वाढीस लागण्यासाठी स्वत:ला तपासावे, स्वत:चा शोध घ्यावा, असे आवाहन सह्याद्री वाहिनीच्या वृत्तसंपादिका ज्याेती आंबेकर यांनी केले. 
 
जळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि रोटरी वेस्टतर्फे शनिवारी मायादेवीनगरातील रोटरी हॉलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर माहिती जनसंपर्क विभागाच्या माजी संचालिका तथा कवयित्री श्रद्धा बेलसरे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल महेश मोकाळकर, उपप्रांतपाल डॉ.राजेश पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप तिवारी यांनी केले. याप्रसंगी आंबेकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या वेळी त्यांनी दूरदर्शनमध्ये काम करताना आलेले अनुभवही सांगितले. 
 
कोणतीही खातरजमा केल्याशिवाय बातमी करू नये. कारण एखादी ओळ, एखादा शब्द समोरच्या माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकताे. यामुळे माझे अनेकदा वादही झाले. त्यामुळे मी खातरजमा केल्याशिवाय पुढचे काम करतच नाही. वृत्तनिवेदन किंवा सूत्रसंचालन करताना आपण जे बोलतो, जे वाचतो ते स्वत:ला समजतेय का? हे तपासावे. म्हणूनच मी बातमी सांगण्यापूर्वी चार वेळा वाचत असल्याचे सांगितले.
 
आंबेकर यांची मुलाखत मृण्मयी रानडे, चैत्राली जावळे, यामिनी कुळकर्णी यांनी घेतली. याप्रसंगी संगीता पाटील यांच्यातर्फे ‘बी केअरफुल’ या पुस्तकाचे, तर नवजीवनचे अनिल कांकरिया यांच्यातर्फे शंभर रुपयांचे कूपन उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन विजय डोहोळे यांनी, तर अनिल कांकरिया यांनी आभार मानले. 
 
‘दिव्य मराठी’च्या मृण्मयी रानडे यांचा सन्मान 
राज्यस्तरावर ‘महिला गौरव’ सन्मान ‘दिव्य मराठी’च्या मृण्मयी रानडे, चैत्राली जावळे, निशा पाटील यांना, तर रुस्तमजीच्या संस्थापिका एच.डी.पेसुना, उद्योग क्षेत्रासाठी लक्ष्मी नरेंद्र नारखेडे उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी वैशाली सूर्यकांत विसपुते यांना ‘महिलाभूषण’ सन्मानाने गौरवण्यात आले. 
 
दिलगिरी अधिकारी म्हणून केले काम 
दुसऱ्या सत्रात श्रद्धा बेलसरे यांनी सांगितले की, एसटी महामंडळाची जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना दररोज सकाळी पत्रकारांचे फोन यायचे. अर्थात, दिलगिरी अधिकारी म्हणूनच मी काम केले. मात्र, त्या काळात मी एस.टी.महामंडळातील लाख भावांची बहीणच झाले होते. तो काळ सुखद आणि चॅलेंजिंग असल्याचेही श्रद्धा बेलसरे यांनी या वेळी सांगितले. त्यानंतर योगेश भोळे, डॉ. राजेश पाटील यांनीही अापले मनोगत व्यक्त केले. 
 
स्वत:ला शिस्त लावा 
तिशीनंतरमहिला हरवलेल्या वाटतात. महिलांनी स्वत:शीच बोलायला हवे. त्यामुळे चिडचिड कमी होईल. टीव्हीतून बुद्धीला खाद्य मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला शिस्त लावा. प्रत्येकीत काही तरी गुण असून, त्यावर लक्ष केंद्रित करा. कामाचा ताण घेता ते काम आनंदाने करायला हवे. आपल्या मुलांना एका टप्प्यावर आले की, दूर ठेवावे. मुलांवर विश्वास ठेवला की, मुले चुकीचे वर्तन करत नाहीत, असेही आंबेकर यांनी उपस्थित महिलांना सांगितले. 
 
पाच मिनिटे आवाजासाठी द्या 
प्रत्येकाने आवाज कसा वापरायचा, हे शिकायला पाहिजे. अर्थात, दिवसातली पाच मिनिटे आवाजाच्या व्यायामासाठी द्यायला हवी. वाहिन्यांवरील नाटिका आणि बातम्या देण्यातील फरक फार मोठा आहे. नाटिकांमध्ये संवाद सांभाळून घेतात. मात्र, बातमी देताना लोकांना निवेदक दिसत असतो. म्हणूनच वृत्तनिवेदक हजरजबाबी असला पाहिजे. त्याच्यातील कौशल्य आणि अनुभवाने कला फुलत जाते, असेदेखील आंबेकरांनी सांगितले. 
 
जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे महिला दिनानिमित्त मृण्मयी रानडे, चैत्राली जावळे, एच.डी.पेसुना, लक्ष्मी नारखेडे, वैशाली विसपुते, निशा पाटील यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी श्रद्धा बेलसरे, ज्योती अंाबेकर, महेश मोकाळकर, डॉ. राजेश पाटील, योगेश भोळे, अनिल कांकरिया, हेमंत अलोने, दिलीप तिवारी आदी. 
बातम्या आणखी आहेत...