आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ बँकांनी एकाच दिवसात बदलून दिले एक कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - केंद्रशासनाने ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने, गुरुवारी सकाळीच नोटा बदलून घेण्यासाठी शहरातील बँकांसमोर रांगा लागल्या. शहरातील २५ बँकांमधून दिवसभरात सुमारे एक कोटी रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या.
५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बँकांबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील विविध बँकांच्या बाहेर सकाळी वाजताच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. नाेटा बदलवून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना बँकांकडून एक अर्ज दिला जात होता. अर्ज भरून त्यासोबत ओळखपत्राची झेरॉक्स जोडल्यानंतर प्रत्येकाला चार हजारांपर्यंत नोटा बदलून देण्यात आल्या. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेबाहेर माेठ्याप्रमाणावर गर्दी झाल्याने मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात अाले होते.
स्टेटबँकेत सात खिडक्या :भारतीय स्टेट बँकेच्या जामनेर राेडवरील मुख्य शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याने बँक व्यवस्थापनाने एकूण सात खिडक्या (काउंटर) उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रत्येकाला चार हजारांप्रमाणे १००, ५०, २० आणि १० रुपयांची बंडले उपलब्धतेप्रमाणे दिली जात होती. शुक्रवारी पुन्हा सकाळपासून बँकांमध्ये रांगा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकांनी वाढीव काउंटर सुरू करणे गरजेचे आहे.

^नाेटा बदलण्यासाठीतसेच बँकेत भरणा करण्यासाठी जाताना नागरिकांनी त्यांच्याजवळील रक्कम सांभाळून न्यावी. घरून निघाल्यावर कुठेही थांबता थेट बँकेत जावे, तसेच बँकेत काेणालाही नाेटा माेजायला देऊ नये. काेणत्याही अनाेळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नये, संशयित व्यक्तीची माहिती बँकेत असलेल्या पाेलिसांना द्यावी. -राेहिदास पवार,डीवायएसपी, भुसावळ

पेट्राेल पंपावरील गर्दी अाेसरली
शहरातील पेट्राेल पंपांवर बुधवारी झालेल्या गर्दीने सर्व विक्रम मोडीत काढले होते. मात्र गुरुवारी शहरातील बँका सुरू झाल्याने पेट्राेल पंपावरील गर्दी कमी झाली. गुरुवारी दुपारनंतर पंपांवर किरकाेळ गर्दी होती. काही पंप सायंकाळी लवकर बंद झाले.

शासकीय चलन घेण्यास नकार
सर्वसामान्य नागरिकांसाेबतच व्यापाऱ्यांचीदेखील गुरुवारी बँकांमध्ये गर्दी झाली. शासकीय चलन भरणाऱ्यांकडून ५०० रुपयांच्या नाेटांचा स्वीकार करण्यास स्टेट बँक कर्मचाऱ्यांनी नकार दिला. यामुळे नाराजी व्यक्त झाली. शहरातील विविध बँकांप्रमाणेच पाेस्टाच्या कार्यालयातदेखील रांगा लागल्या होत्या.

सराफ व्यवसाय ठप्प
चलनातून ५०० एक हजार रुपयांच्या नाेटा बंद केल्यामुळे शहरातील सराफ बाजारात मंदी आली आहे. मंगळवारी बाजारपेठ बंद होती. त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी व्यवहार झाल्याने तीन दिवसांत सराफ बाजारात सुमारे दीड कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. गुरुवारी बँका सुरू झाल्याने आगामी दोन दिवसात व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा सराफ असाेशिएशनचे अध्यक्ष वसंत विसपुते यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...