आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतन मराठा महाविद्यालयात मराठी विज्ञान साहित्य संमेलनाचे उद‌्घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद (जळगाव शाखा) यांच्या संयुक्त विद्यमानाने तिसऱ्या मराठी विज्ञान साहित्य संमेलनाचे नूतन मराठा महाविद्यालयात शनिवारी उद्घाटन झाले. 
 
डॉ.जगदीशचंद्र बोस सभागृहात संमेलनाचे अध्यक्ष चंद्रशेखर कुळकर्णी यांच्या हस्ते प्रतीकात्मक अज्ञानाच्या कुलपास विज्ञानाची किल्ली लावून कुलूप उघडून उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य एल.पी. देशमुख, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पां.देशपांडे, जळगाव शाखेचे कार्यवाह दीपक तांबोळी, उपाध्यक्ष प्रा. एस.व्ही. सोमवंशी, डॉ. विवेक पाटकर उपस्थित होते. 
 
या वेळी नूतन मराठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी उज्ज्वला पाटील हिला विज्ञानातील कार्याबद्दल अभ्यासासाठी एक लाखांची शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात अाला. तसेच नंदकिशाेर शुक्ल यांच्या विज्ञान कवितेचे प्रकाशनही करण्यात अाले. 
 
सोमवंशी यांनी आढावा घेतला. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. अार.बी.देशमुख, प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.पी.पवार, प्रा.राधिका साेमवंशी यांनी सहकार्य केले. प्रा.राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.दिलीप भारंबे यांनी अाभार मानले. 
 
व्यंगचित्रांचे सादरीकरण 
दुसऱ्यासत्रात मुंबई येथील संजय मिस्त्री यांनी विज्ञान व्यंगचित्रांचे सादरीकरण केले. तसेच काही व्यंगचित्रे प्रत्यक्ष काढून दाखवली. तिसऱ्या सत्रात विज्ञानकथा चर्चासत्र घेण्यात अाले. यात प्रा.यशवंत देशपांडे (अाैरंगाबाद), डी.व्ही.कुलकर्णी (मुंबई), शरद पुराणिक (नाशिक), कॅप्टन सुनील सुळे (मुंबई) सहभागी झाले. 
 
बातम्या आणखी आहेत...