आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये मृत्यूचा सापळा; धोका वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरात मान्सूनपूर्व उपाययोजनांना पालिकेने सुरूवात केली आहे. मात्र जीर्ण इमारतींचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. शहरात तब्बल ६० जीर्ण इमारती असून आगामी पावसाळ्यात त्या कोसळल्यास जिवित किंवा वित्त हानी होण्याचा धोका वाढला आहे. मात्र काही जीर्ण इमारतींच्यापरिसरात धोक्याची सूचना देणारे फलकही लावल्याची गंभीर बाब समोर आली आहे. 
 
पावसाळय़ात जीर्ण-पडक्या इमारती कोसळण्याची दाट शक्यता असते. हा धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासन जीर्ण इमारतीच्या मालकांना दर वर्षी नोटिस बजावण्याची औपचारिकता पूर्ण करते. नोटिस बजावल्यानंतर मात्र पालिका प्रशासन या प्रकरणातून अंग काढून घेते. पालिका प्रशासनाकडून दरवर्षी नोटीस मिळत असल्याने जीर्ण इमारतीच्या मालकांनीही या प्रकाराकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. इमारत मालकांनीही या प्रकाराच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष केल्याची स्थिती आहे. शनिमंदिर, विठ्ठलमंदिर, राममंदिर, शिवाजीनगर, जाममोहल्ला, संतोषी माता मंदिर या वॉर्डांसह, मॉडर्न रोड, म्युनिसिपल पार्क या भागातील काही इमारतींसह बालाजी गल्लीतील बमचा वाडा, गांधी चौकातील मांगीलाल बिल्डिंग या इमारती धोकेदायक अवस्थेत आहेत. जवळपास दशकभरापूर्वीच या इमारती जमीनदोस्त होणे आवश्यक होते. धोका लक्षात घेऊन इमारतींमधील रहिवाशांनी इतरत्र स्थलांतर केले आहे. तर काही इमारतींमध्ये अद्यापही व्यावसायिक भाडेकरूंचा रहिवास सुरू आहे. जीर्णावस्थेत असलेल्या या पडक्या इमारतींवर गवत आणि झाडेझुडुपे उगवली आहेत. बाजारपेठेतील मुख्य मार्गालगत असलेल्या काही इमारती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या इमारतींबाबत लवकरच हालचाली झाल्याने शहरात हानी होण्याची शक्यता आहे. जीर्ण इमारतींजवळ पालिका आणि संबंधीत इमारत मालकांनी धोक्याची सूचना देणारे फलक लावणे आवश्यक आहे. मा़त्र असे फलक लावण्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. 

Áवर्दळीच्या मार्गावर धोका : शहरातीलबमच्या वाड्यासह मॉडर्न रोड, शिवाजीनगर भागात जीर्ण इमारतींची संख्या अधिक आहे. यातील काही इमारती वर्दळीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे एखादी इमारत कोसळल्यास प्रसंगी जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. इमारत मालक मात्र गंभीर नाहीत. त्यामुळे समस्या वाढण्याची चिन्हे आहेत. 

Áन्यायालयीन लढ्याचे परिणाम : शहरातीलबहुतांश जीर्ण इमारतींमधील वारसदारांमधील वाद तसेच मूळ इमारतीचे मालक आणि गेल्या अनेक वर्षांपासून भाडेतत्वावर रहिवास करणारे भाडेकरी यांच्यातील वाद न्यायालयात सुरू आहेत. यामुळे मूळ मालक डागडुजी करीत नाही. भाडेकरू राहत असल्याने जीर्ण इमारती नष्टही करता येत नाहीत. 

Áनोटीसला केराची टोपली : पालिकेनेइमारत मालकांना नोटीस बजावली जाते. मात्र बहुतांश सर्वच इमारतींचे मालक पालिकेच्या या नोटीसला केराची टोपली दाखवतात. पालिकेचा धाक राहिला नसल्याने जीर्ण इमारतींच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. जीर्ण इमारती पाडणे गरजेचे आहे. 

फलकाची सक्ती 
Ãशहरातील जीर्णइमारतींच्या मालकांना नोटीस देण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. मान्सूनपूर्व आढावाही तयार करण्यात आला असून जीर्ण इमारतीच्या मालकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. मूळ इमारतीच्या मालकांनी इमारतीच्या परिसरात धोक्याची सूचना देणारा फलक लावण्याबाबतही सक्ती करण्यात येणार आहे. बी.टी. बाविस्कर, मुख्याधिकारी, भुसावळ 

 
बातम्या आणखी आहेत...