आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 हजार नागरिकांना महाप्रसाद वाटप, गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिरात गणेश चतुर्थीला दर महिन्याला नागरिकांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. तसेच मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. अनेक दिवसांपासून या भंडाऱ्याची तयारी केली जाते.
 
 दाेन ठिकाणी मंडप बांधून नागरिकांची जेवणाची व्यवस्था यात केली जाते. मंगळवारी आयोजित केलेल्या भंडारा कार्यक्रमास सर्व नगरसेवकांनी भेटी दिल्या. प्रथम पुरोहित सुनील बारपांडे, प्रमाेद जाेशी, रवींद्र नांदे, भूषण पाठक यांनी देवास नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर भंडाऱ्यास सुरुवात झाली. 
 
गेल्या ११ वर्षांपासून काेणाकडे जाता प्रत्येक भाविक अापल्या परीने या ठिकाणी भंडाऱ्यासाठी लागणारे साहित्य अाणून देत असताे. सगळे सामान हे काेणी ना काेणी देत असते. लोकसहभागातून या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे श्याम काेगटा यांनी सांगितले. 
 
इच्छापूर्ती गणेश महादेव मंदिर ट्रस्टतर्फे गणेश जयंती इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त नवीपेठ परिसरात अायाेजित महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक. 
श्याम काेगटा, नगरसेवक मनाेज चाैधरी, राजू माेरे, श्रीनिवास व्यास, गणेश गायकवाड, पवन ठाकूर, नीलेश पाटील, सम्राट बेलदार, किरण राजपूत, कैलास चाैधरी, अनिल काेळी, रमेश माळी, बंडू कासार, जितू वाघ, समीर कुलकर्णी, निखिल कुळकर्णी, याेगेश कलंत्री, दिनेश राठी, महेश मणियार, गाेटू जाेशी, अानंद महांगडे, शशी बियाणी, सत्तू मंडाेरा, सुनील मुंगड, प्रशांत पाटील, मनीष झंवर, अजय गांधी, प्रशांत बाेंडे, अनिल अग्रवाल यांचे सहकार्य मिळाले. 
 
इच्छापूर्ती गणेश महादेव मंदिर ट्रस्टतर्फे गणेश जयंती इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शहरातील २१ हजार नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. भंडाऱ्याचे हे ११ वे वर्ष असून लाेकसहभागातून दरवर्षी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. यासाठी तब्बल ४५० कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. 
बातम्या आणखी आहेत...