आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुल्या जागांच्या ताब्यावरून खाविअाचे सोईस्कर दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील पालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा ताब्यात घेण्याच्या विषयावर सत्ताधारी खाविअाने पुन्हा सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. अातापर्यंत व्यावसायिक वापर करणाऱ्या संस्थांना पुन्हा संधी देत नागरिकांच्या हितापेक्षा हितचिंतकांची काळजी करण्यात अाली. अायुक्तांनी केवळ ठराव करा दाेन महिन्यांत सर्व जागा ताब्यात घेण्याच्या अावाहनाकडेही सोईस्कररित्या दुर्लक्ष करण्यात अाले. भाजपनेही खुल्या जागांचा ठराव करण्याचा रेटा लावून धरला; परंतु बहुमताच्या जाेरावर खाविअाने पुन्हा एकदा वेळ मारून नेली. 
 
महापालिकेची महासभा शनिवारी सकाळी ११ वाजता महापाैर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत महापालिकेने विविध संस्थांना वितरित केलेल्या खुल्या जागांचा ठराव रद्द करून त्या ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सादर केला हाेता. त्यावर खाविअाने ज्या जागा विकसित केल्या अाहेत. त्या ठिकाणचे अतिक्रमण तसेच नियमबाह्य कामकाज प्रशासनाने त्वरित काढावे, जागांचा ताबा दिल्यानंतरही अद्याप विकसित केलेल्या नाहीत त्यांना शेवटची संधी म्हणून सहा महिन्यांची मुदत द्यावी. करारनाम्यातील अटी- शर्तीनुसार जागा विकसित करणे बंधनकारक करणे, त्याचा मासिक अहवाल मागवणे, करारनामा केलेल्या संस्थांसाेबत कायदेशीर पूर्तता करणे, ज्या जागा शाळांना लागून असतील त्या जागा संबंधित शाळांना प्ले ग्राउंडसाठी प्राधान्याने द्याव्या. विकसित झालेल्या परंतु व्यावसायिक प्रयाेजनासाठी वापरात असतील तर अशा संस्थांना चारपट मालमत्ता कराची अाकारणी करणे, या जागांमध्ये खुला प्रवेश असावा, असा ठराव मंजूर केला; परंतु मालमत्ता कराची चारपट वसुली ही कायद्याला धरून नसल्याचे अायुक्त जीवन साेनवणेंनी स्पष्ट केले. भाजपच्या सदस्यांनीही ३९७ जागांचे ठराव रद्द करण्याची मागणी लावून धरली. गेल्या दाेन वर्षांपासून हा विषय चघळला जात असून वारंवार सभेसमाेर येत असल्याने नाराजी व्यक्त केली. अायुक्तांनी देख‌ील सभागृह निर्णय घेत नसल्याने वारंवार विषय मांडावा लागत अाहे. सभागृहाने ठराव करून दिल्यास दाेन महिन्यांत सर्व जागा ताब्यात घेण्याचे अाश्वासन दिले. परंतु सत्ताधारी खाविअाने बहुमताच्या जाेरावर ठाेस निर्णय घेता पुन्हा एकदा वेळ मारून नेली. त्यामुळे ज्या भागातील जागा नागरिकांना विकसित करायच्या अाहेत, त्यांना पुन्हा पाठपुरावा करावा लागणार अाहे. 

हाॅकर्सचाविषय तहकूब 
मुलींची अायटीअाय भिंतीला लागून असलेले हाॅकर्स बहिणाबाई उद्यानाजवळील हाॅकर्सला पर्यायी जागा देण्याचा विषय तहकूब ठेवण्यात अाला. हाॅटेल स्टेप इनसमाेर हाॅकर्सला जागा दिल्यास वाहतुकीच्या रस्त्यावर पुन्हा वाहतुकीची काेंडी हाेण्याची भीती व्यक्त करण्यात अाली. शहरातील हागणदारीमुक्तीसाठी वैयक्तिक शाैचालयासाठी अर्ज दाखल केलेल्या लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात अाली. अनेकांचे बांधकाम पूर्ण झालेले असतानाही त्यांना अनुदान वितरित केलेले नाही. तसेच अनेकांचे अर्ज दिलेले असतानाही त्यावर कार्यवाही हाेत नसल्याची तक्रार करण्यात अाली. या वेळी अाठ दिवसांत शहरातील सर्व लाभार्थ्यांच्या समस्या साेडवण्याची सूचना करण्यात अाली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत १४ व्या वित्त अायाेगाच्या प्राप्त निधीतून कामांसाठी काेटी ३२ लाख रुपये खर्चास कैलास साेनवणेंनी अाक्षेप घेतला. एवढा पैसा कशासाठी खर्च हाेणार , यामागे काही लाेकांना पाेसले जाण्याची शक्यता वर्तवली. प्रदीर्घ चर्चेनंतर हा विषय तहकूब ठेवण्यात अाला. दुसरी विकास याेजना तयार करण्यासाठी विशेष घटक निर्माण करण्याबाबतच्या ठरावाला भाजपने विराेध केला. त्यामुळे बहुमताने मंजुरी देण्यात अाली. 

रमेशचंद्र अग्रवाल यांना श्रद्धांजली 
सभेच्या सुरुवातीला महापाैर नितीन लढ्ढा यांनी दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या निधनामुळे श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. अन्य नगरसेवकांनीही सादर केलेल्या प्रस्तावानंतर संपूर्ण सभागृहाने दाेन मिनिटे उभे राहून रमेशचंद्र अग्रवाल यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

अनंत जाेशी रवींद्र पाटील यांनी सागर पार्कच्या जागेचे अारक्षण बदलाचा विषय सभागृहासमाेर अालाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला. यामागे काही लाेकांचा हात असून काेट्यवधी रुपये कमावणे हाच उद्देश अाहे. शहरात खेळांसाठी जागा शिल्लक नसताना अशा पद्धतीने चुकीचे प्रस्ताव सादर केल्यास सहायक संचालकांविरुद्ध फाैजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात अाला. या निर्णयामुळे नगरसेवकांवर वसुली निघेल, असाही मुद्दा मांडला परंतु अायुक्तांनी अारक्षण बदलणे म्हणजे टीपी डीपी स्किमपैकी एकच अारक्षण ठेवण्याचा विषय असल्याचे स्पष्ट केले. यामुळे काेणतीही वसुली निघणार नसून त्याची जबाबदारी प्रशासन घेईल, असेही जाहीर केले. दरम्यान, महापाैर लढ्ढा जाेशी यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली. सहायक संचालक के. पी. बागुल यांच्यावर निशाना साधत धारेवर धरण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...