आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्काळ खड्डे बुजवण्याचे दिले आदेश, राज्य शासनाकडेही करणार पाठपुरावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हाेणाऱ्या अपघातांसंदर्भात ‘दिव्य मराठी’ने घेतलेल्या ड्राइव्हमुळे साेमवारी स्वयंस्फूर्तीने सर्वपक्षीय दबावगट तयार झाला. या दबाव गटाची पहिलीच बैठक सोमवारी सायंकाळी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात झाली. त्यानंतर या दबाव गटाने रात्री तातडीने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मागण्यांचे निवेदन दिले. मंत्री महाजन यांनी निवेदनाची दखल घेऊन राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गावर असलेले खड्डे बुजवण्याचे काम त्वरित सुरू करण्याचे अादेश दिले.
पाळधी बायपास ते तरसोदपर्यंतचा १८ किलोमीटरचा महामार्ग शहरातून जातो. या महामार्गाचे काम हाेऊन शहरवासीयांचे जीवन सुकर करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने ड्राइव्ह घेतला. यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, विविध राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था, संघटनांना संघटित हाेण्याचे आवाहन केले हाेते. सोमवारी सर्वांनीच या अावाहनाला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिला. सर्वच पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन एक दबावगट तयार केला आहे. या दबाव गटाची बैठक सायंकाळी वाजता ‘दिव्य मराठी’ कार्यालयात झाली. त्यानंतर रात्री वाजता एकत्रित मागण्यांचे निवेदन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले. या वेळी सर्वांनी ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताबाबत माहिती दिली. तसेच गेल्या वर्षात महामार्गावर झालेल्या ३५० अपघातांत सुमारे १६० नागरिकांना जीव गमवावा लागला. या माहितीसाेबतच ‘दिव्य मराठी’ने महामार्गावरील वाहतुकीची काेंडी, अपघातांची संख्या, महामार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या त्यांच्या समस्यांची दाहकता वस्तुनिष्ठ प्रकट केली. निवेदन स्वीकारल्यानंतर मंत्री महाजन यांनी तत्काळ दखल घेत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांना मंगळवारपासून महामार्गावरील ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर सर्वपक्षीय दबाव गटाची स्थापना बैठक
- मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मांडले राष्ट्रीय महामार्गाचे गाऱ्हाणे
मंत्री महाजनांनी दिले दबावगटाला ठोस आश्वासन
- नहीचे विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे आहे. त्यामुळे जळगावकरांना तक्रार करणे शक्य होत नाही. त्यामुळे या कार्यालयातील प्रतिनिधी जळगावात उपलब्ध करून देणे. त्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी जाहीर करणे.
निवेदनातून केल्या मागण्या
- नशिराबाद नाका ते बांभोरीदरम्यान तातडीने समांतर रस्त्यांची निर्मिती करणे.
- महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम दोन दिवसांत सुरू करणे.
बैठकीत ठरवण्यात अाली अांदाेलनाची दिशा
आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात सर्वपक्षीय दबावगटाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत समांतर रस्त्यांसह महामार्गावरील खड्ड्यांचे मुद्दे चर्चेला आले. तसेच दबावगटाच्या पुढील कार्याची दिशा ठरवण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात शासन दरबारी न्याय मागण्यात येईल. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देताना अामदार सुरेश भाेळे, अामदार चंदूलाल पटेल, गजानन मालपुरे, सचिन नारळे,राम पवार, विनाेद देशमुख, डाॅ.राधेश्याम चाैधरी, गनी मेमन, विलास पाटील, अमित जगताप यांच्यासह सर्वपक्षीय दबावगट.

जिल्हाधिकाऱ्यांनी आज बोलावली तातडीची बैठक
महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बाेलावली अाहे. महामार्ग चाैपदरीकरण, जळगाव शहराला बायपास करताना शहरातील मार्गाची दुरुस्ती करण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणावर अाहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील महामार्गासाठी साडेचारशे काेटींच्या निधीची घाेषणा केली अाहे. यासंदर्भात वर्षभरात काय ठाेस उपाययाेजना केल्या? यासंदर्भात जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करणार अाहेत. बैठकीला उपजिल्हाधिकारी, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, व्यवस्थापक, संबंधित विभागांचे भूसंपादन अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...