आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: दीपनगरात ‘अॅश रिफिलिंग’चा गोरखधंदा थांबवण्यात अपयश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपनगर केंद्राबाहेर अशा प्रकारे मध्यरात्री अॅश रिफिलिंग केले जाते. - Divya Marathi
दीपनगर केंद्राबाहेर अशा प्रकारे मध्यरात्री अॅश रिफिलिंग केले जाते.
भुसावळ - दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बल्करद्वारे ओरिएंट सिमेंट फॅक्टरीत राखेची वाहतूक केली जाते. मात्र, दोन बल्करमधील राख एकाच बल्करमध्ये रिफिलिंग करून ओव्हरलोड वाहतूक केली जाते. ‘दिव्य मराठी’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर बंद झालेला हा गोरखधंदा पुन्हा सुरू झाला आहे. याकडे दीपनगर प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. 
 
दीपनगर केंद्रातील फ्लाय अॅश बल्करद्वारे ओरिएंट सिमेंट कंपनीत पाठवली जाते. एका बल्करमध्ये आठ ते दहा टन राख भरून मिळते. मात्र, कमी वजनाची वाहतूक परवडत नसल्याने बल्करचालक दोन बल्करची राख रिफिलिंग करून एकाच बल्करमध्ये भरतात. दीपनगरच्या परिसरात मध्यरात्री हा गोरखधंदा बिनधास्तपणे सुरू आहे. दीपनगरातील फ्लाय अॅश विभागातील काही कर्मचारी, अधिकारी यांचेही हात या गोरखधंद्यात काळवंडले आहेत. स्थानिक कामगार युनियनच्या नावाने दहशत माजवून अॅश रिफिलिंगसह अन्य शेकडो कर्मचारी या धंद्यात अडकले आहेत. अॅश रिफिलिंगमध्ये ओव्हरलोड वाहनामुळे अपघाताची शक्यता वाढते. मात्र, दीपनगरातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीने हा धंदा बिनधास्तपणे सुरू आहे. दीपनगरात माजी मुख्य अभियंता अभय हरणे यांच्या कार्यकाळात हा धंदा बंद होता. त्यांच्या बदलीनंतर परप्रांतीय ठेकेदारांनी हा धंदा सुरू केला आहे. 
 
अॅश वाहतुकीसाठी कोट्यवधींचे कंत्राट 
दीपनगर केंद्रातून निघणारी बॉटम अॅश वेल्हाळे बंडापर्यंत वाहतूक करण्यासाठी तीन कंपन्यांना कोट्यवधींचे कंत्राट दिले आहे. मात्र, या बहाद्दरांकडून राख उचलून दीपनगरच्या महामार्ग परिसरात टाकली जाते. केवळ कागदोपत्री बिले काढून महानिर्मितीची लूट केली जात असल्याने पायबंद गरजेचा आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...