आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : वादानंतर अारटीअाे कार्यालय परिसरातील अतिक्रमण हटवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरटीओ कार्यालयालगतचे अतिक्रमण काढताना मनपा कर्मचारी. - Divya Marathi
आरटीओ कार्यालयालगतचे अतिक्रमण काढताना मनपा कर्मचारी.
जळगाव- महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शनिवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन विभाग (अारटीअाे) कार्यालयालगतचे अतिक्रमण हटवण्यात अाले. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही धडक माेहीम राबवली. या माेहिमेत ट्रक ट्रॅक्टर साहित्य जप्त करण्यात अाले. अचानक झालेल्या या कारवाईने परिसरात काही वेळ गोंधळ उडाला हाेता.
 
शुक्रवारी मद्यधुंद एजंटने उपप्रादेशिक परिवहन विभागातील परिवहन अधिकाऱ्यांशी वाद घातला हाेता. त्यामुळे परिवहन अधिकाऱ्यांनी एजंटसह दलालांना कार्यालयाबाहेर काढले होते. शनिवारी अारटीअाे कार्यालयात एजंटला प्रवेशबंदी करण्यात अाली हाेती. मात्र, बहुतांश एजंट प्रवेशद्वारासमोर भिंतीलगत बसणाऱ्या इतर एजंटजवळच खुर्च्या टेबल टाकून बसले होते.
 
आरटीओ जयंत पाटील यांनी महापालिकेच्या कॉलसेंटरवर कायालर्याचे प्रवेशद्वार भिंतीलगत असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार केली. 
 
तसेच यासंदर्भात लेखी तक्रार महापालिकेत देऊन आयुक्तांशी देखील चर्चा केली. या तक्रारीवरून महापालिकेने शहरातील सर्व अतिक्रमण पथके बोलावून घेतली. प्रभाग अधिकारी सुशीलसाळुंके अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावरील एजंटच्या टपऱ्या, खुर्च्या, टेबल असे दोन ट्रक तीन ट्रॅक्टर साहित्य जप्त करण्यात आले. 
 
साेमवारी चर्चा करू : अारटीअाे कार्यालयालगत असलेल्या अतिक्रमणाबाबत यापूर्वीही दाेन तीन वेळा समज देण्यात अालेेली हाेती. वाहन चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हायकाेर्टाचा अंतरिम अादेश दाखवला. मात्र, त्यांना अंतिम अादेशाची मागणी केली. त्यांनी ताे दाखवताे म्हटले. मात्र, अद्याप अादेश दाखवलेला नाही. फाेनवर याबाबत साेमवारी चर्चा करू, असे सांगितले अाहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील म्हणाले. 

अादेश दाखवा मग घेऊ निर्णय 
एजंटला बंदीबाबत आरटीओ जयंत पाटील यांच्या दालनात जाऊन वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष रज्जाक खान गनी खान, सचिव सुरेश पाटील इतर सदस्यांनी चर्चा केली. या वेळी संघटनेकडून तुम्ही कार्यालयात येण्यापासून वाहनचालक मालकांच्या प्रतिनिधींना रोखू शकत नाही, असे सांगितले. याबाबत हायकोर्टाचे आदेश असल्याचे ते म्हणाले. यावर आरटीओ पाटील यांनी हायकोर्टाचे आदेश दाखवा मग निर्णय घेऊ असे सांगितले.