आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यात बापाकडून मुलीचा खून, परधर्मीय मुलासाेबतच्या प्रेमसंबंधामुळे ऑनर किलिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धरणगाव (जि. जळगाव)- परधर्मीय तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या वादातून एका २८ वर्षीय तरुणीचा बापाने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात उघडकीस आली. पाेलिसांनी याप्रकरणी अाराेपी बापावर गुन्हा दाखल करून अटक केली अाहे.
      
धरणगाव शहरातील पिल्लू मशीद परिसरातील अब्दुल कय्युम अब्दुल रहीम मनियार (वय ६७) यांची मुलगी नसरीनबी (वय २८) हिचे परधर्मीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. दाेन जानेवारीच्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास नसरीनबी हिला भेटण्यासाठी संबंधित तरुण आला होता. मनियार यांना ही बाब प्रचंड खटकली. या वेळी बाप-लेकीत मोठा वाद झाला. मनियार यांनी आपल्या मुलीला संबंधित मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. परंतु, तिने या गोष्टीस स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर मनियार यांनी आपल्या भावाच्या घरी जाऊन मुलीला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या मनियार यांनी तिला भावाच्या घरून परत रात्री ३.३०  वाजेच्या सुमारास अापल्या घरी आणून मारहाण करायला सुरुवात केली. त्यातच संतापाच्या भरात तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळला. त्यामुळे नसरीनबी जागेवरच गतप्राण झाली. यासंदर्भात अब्दुल कय्युम अब्दुल रहिम मनियार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात अाले. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू अाहे. 

घटस्फाेटानंतर प्रेमसंबंध  
नसरीनबी हिचा काही दिवसांपूर्वी पतीसोबत घटस्फोट झालेला होता, तिला दोन लहान मुले आहेत. धरणगावात परत आल्यानंतर तिचे संबंधित तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, यातच तिला जीव गमावावा लागला व तिच्या लहान मुलांचे मातृछत्र हरपले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...