Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Padmashree Mahanor

एक्सक्ल्युझिव्ह: पद्मश्री महानाेरांवर अस्वच्छतेमुळे स्वत:चे साेडून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ

चरणसिंग पाटील | Oct 12, 2017, 09:45 AM IST

जळगाव-जळगाव शहरातील खासगी भूखंडांवरील अस्वच्छता हा गंभीर मुद्दा बनला अाहे. यामुळे शहरात डेंग्यू, चिकुनगुन्या इतर अाजारांचे रुग्ण प्रचंड वाढले अाहेत. त्याचा फटका जळगाव शहराच्या स्वच्छता अभियानाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर, पद्मश्री कविवर्य ना. धाें. महानाेर यांनासुद्धा बसला अाहे. सलग तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही जळगावातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या अादर्शनगरातील घराजवळील परिसर स्वच्छ हाेत नसल्याने स्वत:चे घर साेडून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ महानाेरांवर अाली अाहे. जळगाव शहरातील सुमारे २८ हजार खासगी भूखंड अक्षरश: कचऱ्याचे अागार झाले अाहेत. त्या ठिकाणी अाजूबाजूच्या रहिवाशांकडून टाकला जाणारा कचरा, उष्ट्या अन्नामुळे दुर्गंधी निर्माण हाेत अाहे. यामुळे शहरात डेंग्यू चिकुनगुन्याचे दाेन हजारांपेक्षा जास्त रुग्ण अाढळले अाहेत. घराजवळील खुल्या भूखंडावर कचरा हाेऊ नये, यासाठी कविवर्य महानाेरांनी अनेकवेळा जळगाव मनपाकडे लेखी, ताेंडी तक्रारी केल्या. त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे शेवटी स्वत:चे हक्काचे घर साेडून भाड्याच्या घरात जाण्याची वेळ त्यांच्यावर अाली. यासंदर्भात महानाेर यांनी मांडलेल्या भावना त्यांच्याच शब्दात...

जळगाव शहरातील खुल्या भूखंडावरील अस्वच्छता हा अतिशय गंभीर विषय झाला अाहे. प्लाॅटचे पैसे वाढवण्यासाठी काही श्रीमंत व्यक्ती गुंतवणुकीसाठी जागा घेऊन ठेवतात. त्या जागांवर बांधकामही करत नाहीत अाणि जागेची किंमत वाढली तरी विकत नाहीत. मी अादर्शनगरात गेल्या १२ वर्षांपासून राहत अाहेेे. घर घेण्याच्या १० वर्षांपूर्वी घराशेजारील खुला भूखंड तसाच अाहे. माझ्याकडे उपमुख्यमंत्री, मंत्री, साहित्यिक, कलावंत, अभिनेते अनेकदा येऊन गेले. त्यांनादेखील घराशेजारील प्लाॅटमधील घाणीमुळे हाेणारा त्रास सहन करावा लागला अाहे. अनेकदा अाजूबाजूच्या नागरिकांना समजावून सांगितल्यानंतरही घंटागाडीची प्रतीक्षा करता ते खुल्या जागेत घरातील कचरा शिळे अन्नपदार्थ टाकून माेकळे हाेतात. यामुळे गुरे कुत्र्यांचा वावर याठिकाणी नेहमी असताे. कुत्र्यांच्या विष्टेमुळे अत्यंत दुर्गंधीचा सामना करावा लागताे.

घराजवळील रुस्तमजी शाळेची सर्व घाणदेखील याच ठिकाणी टाकली जाते. शाळेत मुलांना ने-अाण करणारे पालकही परिसरातून जाताना नाका-ताेंडाला रुमाल बांधून जातात. दाेन-तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर पाेलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे येऊन गेले. त्यांनी देखील ही परिस्थिती अनुभवली. त्यांनी शाळा प्रशासनाला तंबी देखील दिली. काही दिवस सुरळीत चालले; परंतु पुन्हा ताेच त्रास सहन करावा लागताेय. जागा मालकदेखील काहीही करायला तयार नाही.

जळगाव मनपाने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशाेक जैन, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम मला शहराचा स्वच्छतादूत नेमले. जळगाव शहरातील स्वच्छतेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेल्या माझ्या सारख्या माणसाला हा त्रास अाहे, तर सर्वसामान्यांचे काय हाेत असेल. खरे तर शहरात स्वच्छतेच्या बाबतीत काहीही हाेत नाही. नावालाच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नेमलो गेलो अाहे. राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी शहर ग्रामीण भागासाठी स्वच्छतेचा संदेश देणारी कविता माझ्याकडून लिहून मागवली. तीन कडव्यातील ही कविता राज्यातील अन्य शहरात वापरली गेली. परंतु, जळगाव शहरात त्याचा काहीही उपयाेग केलेला दिसत नाही. घराजवळील अस्वच्छतेचा त्रास असह्य झाल्याने मी स्वत:च्या हक्काच्या घराला कुलूप ठाेकून महिनाभरापासून परिवारासह रायसाेनीनगरात भाड्याच्या घरात राहत अाहे.

Next Article

Recommended