आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ पंचायत समितींत महिला होणार सभापती, जळगाव जिल्ह्यातील पं. स.चे अारक्षण जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापती पदांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या साेडतीत पंधरापैकी नऊ पंचायत समितींचे सभापतिपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. 
 
जळगाव पंचायत समिती पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे. मुक्ताईनगर- अनुसूचित जमाती महिला, एरंडोल- अनुसूचित जमाती महिला, जामनेर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, धरणगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, यावल- सर्वसाधारण महिला, रावेर- सर्वसाधारण महिला, पारोळा- सर्वसाधारण महिला, चाळीसगाव- सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. या नऊ पंचायत समितींमध्ये महिला सभापती होणार आहेत. पाचोरा, चोपडा भडगाव या तीन पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. अमळनेर-अनुसूचित जमाती तर भुसावळ बोदवड पंचायत समिती सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. अारक्षण काढताना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, उपजिल्हाधिकारी निवडणूक मनोहर चौधरी, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...