आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायराज दिनविशेष : शासकीय योजना राबवणारे साकेगाव ग्रामीण विकासाचे रोल मॉडेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शासनाच्या विविध याेजना गावपातळीवर राबवून गावाचा विकास साधण्याचे आदर्श उदाहरण साकेगाव ग्रामपंचायतीने समोर ठेवले आहे. 
 
वाघूर नदीच्या काठावर वसलेल्या साकेगावची लाेकसंख्या १५ हजार अाहे. कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्या ग्रामस्थांना तसेच गावातील काही दुकानदारांना मोफत डस्टबीन दिल्या आहेत. पंतप्रधान अावास याेजनेअंतर्गत ५० घरकुलांचे काम सुरू करण्यात अाले अाहे. बेघर कुटुंबासाठी ही याेजना यशस्वीपणे राबवली जात अाहे. गावातील दलित वस्तीमध्ये भुयारी गटारी तयार करण्यात अाल्या अाहेत. तर १४व्या वित्त अायाेगाच्या माध्यमातून गावात अारअाे प्लांट मंजूर करण्यात अाला अाहे. ग्रामस्थांना विविध प्रकारचे ३२ दाखले त्वरीत मिळावे, तसेच विद्यार्थ्यांना अाॅनलाईन अर्ज, अाधारकार्ड नोंदणी अादी कामांसाठी डीजिटल सभागृह बांधले जात आहे. 

डिजिटल सभागृहाची उभारणी प्रगतिपथावर आहे. 

ग्रामस्थांना अंघोळीसाठी गरम पाणी देणार 
संपूर्णकराची रक्कम भरणाऱ्या गावकऱ्यांना सकाळी अंघोळीसाठी माेफत गरम पाणी तसेच दळण दळून दिले जाणार अाहे. यासंदर्भातील यंत्रणा उभारण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. हागणदारीमुक्त अभियान यशस्वी करण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे, अशी माहिती सरपंच अानंदा ठाकरे यांनी दिली. 

जलकुंभ भरण्यासाठी अाधुनिक प्रणालीचा वापर 
गावातील जलकुंभास ग्रामपंचायतीने अधुनिक यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे पंप सुरू आणि बंद करण्याची माहिती एसएमएसद्वारे मिळते. जलकुंभातील साठा अर्धा झाल्यावर पंप अापाेअाप पंप सुरू हाेतो, तसेच पूर्ण भरल्यावर आपोआप बंद होतो. या अत्याधुनिक प्रणालीमुळे जलसाठ्यासह आणि विजेची बचत होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...