Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Pankaj Did Not Believe In Murder, The Ghost Of Dead Praveen Mali

पंकजने खून केल्याचा विश्वास बसला नाही, मृत प्रवीण माळी याच्या अाईस आश्चर्याचा धक्का

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 08:52 AM IST

  • पंकजने खून केल्याचा विश्वास बसला नाही, मृत प्रवीण माळी याच्या अाईस आश्चर्याचा धक्का
जळगाव - ‘साहेब,प्रवीण पंकज हे दाेघे मित्र हाेते. हाेळीच्या दिवशी पंकज अामच्या घरी अाला हाेता. त्याने जेवण करून प्रवीणच्या मुलाला पैसे दिले हाेते. त्यामुळे पंकजने प्रवीणचा खून केला यावर सुरुवातीला अामचा विश्वास बसला नाही. प्रवीणच्या मृत्यूमुळे अामच्या कुटुंबाचा अाधार गेला अाहे. त्याच्या महिन्यांच्या चिमुकल्याकडे काेण बघणार? असा प्रश्न प्रवीणच्या अाईने गुरुवारी शनिपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अात्माराम प्रधान यांना केला.
प्रवीणचा खून झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय नातेवाईक गुरुवारी शनिपेठ पाेलिस ठाण्यात त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी गेले हाेते. त्या वेळी त्याची अाई रेखाबाई माळी, पत्नी पूजा माळी, पाच महिन्यांचा चिमुकला प्रेम अाणि सतीश माळी, राजेंद्र माळी, गाेविंदा माळी, किशाेर माळी, पुष्पा माळी, हिराबाई माळी, बेबाबाई माळी, संगीता माळी, अाशा माळी, अशाेक माळी यांनी निरीक्षक प्रधान यांची भेट घेऊन अापली व्यथा मांडली. पंकज अाणि राहुल यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा त्याच्या कुटुंबीयांनी प्रधान यांच्याकडे व्यक्त केली.

Next Article

Recommended