आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्रा बँक योजनेंतर्गत एक हजारावर प्रस्तावांना मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- पंतप्रधान मुद्रा बँक योजनेंतर्गत विविध बंॅकांतर्फे तब्बल एक हजार १२२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, ४४ कोटी ११ लाख १७ हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण झाले आहे. या योजनेमुळे अनेकांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागणार आहे.
शासनाच्या विविध योजनेंतर्गत बेरोजगारांना रोजगारासाठी जिल्हा उद्योग केंद्र, विविध महामंडळे, बँकांमधून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते; परंतु हे कर्ज मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्याचबरोबर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे खिसे गरम करावे लागतात. त्यानंतरही कर्ज मिळेल की नाही याची शाश्वती नसते.
त्यामुळे व्यवसाय करण्याची इच्छा असूनही अनेकांना व्यवसाय सुरू करता येत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने पतंप्रधान मुद्रा बँक योजना सुुरू केली अाहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून शिशू, कुमार तरुण या तीन गटांसाठी कर्ज देण्यात येते. या योजनेची घोषणा एप्रिल महिन्यात करण्यात आली होती.

योजनेंतर्गत हजार १२२ कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून, ४४ कोटी ११ लाख १७ हजार रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. योजनेमुळे स्वयंरोजगारात वाढ होणार आहे. मुद्रा योजनेचा लाभ घेणाऱ्यांना तारण, गहाण, साक्षीदारांची आवश्यकता नसल्यामुळे अनेकांनी या योजनेतून कर्ज मिळावे यासाठी अर्ज केले होते. त्यात लघु उद्योजकांचा समावेश होता. योजनेचा बचत गटांनाही लाभ मिळणार असून, आतापर्यंत सर्वाधिक कर्ज हे शिशू गटांतर्गत वितरित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

बँकनिहाय कर्ज वितरण
पंतप्रधानमुद्रा बँक योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६ बँकांनी कर्ज वितरण केले आहे. त्यात बँक ऑफ अलाहाबादने २३, बँक ऑफ बडोदाने ७, बँक ऑफ इंडियाने ६१, बँक ऑफ महाराष्ट्रने १८, कॅनरा बँकेने ३, सेंट्रल बँकेने ११२, कॉर्पोरेशन बँकेने २६, देना बँकेने १९, आयडीबीआय बँकेने ४, पंजाब नॅशनल बँकेने २, सिंडीकेट बँकेने १२, युको बँकेने ४, युनियन बँकेने ३०, विजया बँकेने १३, स्टेट बँक आॅफ हैदराबादने १०३, स्टेट बंॅक ऑफ इंडियाने ५१०, एचडीएफसी बँकेने प्रकरणे मंजूर केली आहेत. आयसीआयसीअाय बँकेने एकही प्रकरण मंजूर केलेले नाही.

कर्जाचे तीन प्रकार
मुद्राबँक योजनेत तीन प्रकारचे कर्ज मिळते. त्यानुसार शिशू गटासाठी ५० हजार, किशोर योजनेंतर्गत ५० हजार ते लाखांपर्यंत तर तरुण योजनेंतर्गत पाच ते दहा लाखांपर्यंत कर्ज वितरित करण्यात येते.

याव्यवसायांसाठी कर्ज
मुद्राबँकेअंतर्गत परिवहनासाठी उपयोगी वाहन, मालवाहू वाहन, रिक्षा, तीनचाकी प्रवासी ऑटो टॅक्सी, ब्युटी पार्लर, कटिंग सलून, बुटीक, शिलाई दुकान, ड्रायक्लीनिंग, सायकल मोटारसायकल दुरुस्ती, डीटीपी, फोटोग्राफी सुविधा,औषध दुकान, कुरिअर, खाद्य पदार्थ, पापड उद्योग, केटरिंग, शीतगृहासाठी कर्ज देण्यात येणार आहे.