आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवननगरात धडक कारवाईत तीस किलाे गांजा जप्त; एकास काेठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - चाळीसगाव राेडवरील पश्चिम हुडकाेतील पवननगरातील एका घरातून पाेलसांनी केलेल्या कारवाईत एक लाख एेंशी हजारांचा काेरडा गांजा जप्त केला अाहे. याप्रकरणी दाेघांविरुद्ध पाेलसांत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. याप्रकरणी एकाला अटक करून जानेवारीपर्यंत पाेिलस काेठडी देण्यात अाली अाहे, तर अन्य एक जण फरार अाहे. 
 
पाेिलस अधीक्षक चैतन्या एस. यांना िमळालेल्या माहितीवरून पश्चिम हुडकाे परिसरामध्ये राहणारा ज्ञानेश्वर मुरलीधर चाैगुले, त्याचा भाऊ संजय मुरलीधर चाैगुले या दाेघांनी घर नं. ३३३, पश्चिम हुडकाे, चाळीसगाव राेड येथे बेकायदेशीररीत्या मादक पदार्थ िवक्री करण्याच्या उद्देशाने गांजाचा साठा केलेला अाढळून अाला. या ठिकाणी पाेिलस अधीक्षकांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेिलस निरीक्षक देविदास शेळके, हेडकाॅन्स्टेबल देवेंद्रसिंग परदेशी, छाेटू बाेरसे, चुनीलाल सैंदाणे, सुशील देवले, प्रभाकर ब्राह्मणे, वसंत पाटील, नितीन मच्छिंद्र पाटील, महिला काॅन्स्टेबल कविता प्रशांत देशमुख यांच्या पथकाने छापा टाकून संजय चाैगुले ज्ञानेश्वर चाैगुले यांच्या घरातून लाख ८२ हजार ७०० रुपये किमतीचा ३० किलाे काेरडा गांजा साहित्य जप्त केले. याबाबत सहायक पाेिलस निरीक्षक विनाेद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अाझादनगर पाेिलस स्टेशनमध्ये संजय ज्ञानेश्वर मुरलीधर चाैगुले यांच्याविरुद्ध गुंगीकारक अाैषधी द्रव्ये मनाेव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनयम १९८५चे कलम २० (ब)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. संजय चाैगुले याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, जानेवारीपर्यंत पाेिलस काेठडी देण्यात आली. 

पश्चिम हुडको परिसरातील पवन- नगरात पोलिसांनी पकडलेल्या गांजाचा पोलिस ठाण्यात लावलेला ढीग. 
बातम्या आणखी आहेत...