आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

276 वाहनधारकांकडून केला 55 हजार रुपयांचा दंड वसूल,‘दिव्य मराठी’ वृत्तमालिकेनंतर कारवाईची मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नियम मोडल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई केली जात आहे. - Divya Marathi
नियम मोडल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई केली जात आहे.
भुसावळ - विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर डिसेंबरपासून कारवाई केली जात आहे. ते १२ डिसेंबर या कालावधीत शहरात २७६ वाहनधारकांवर कारवाई झाली असून, ५५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

‘दिव्य मराठी’ने दि.३ ते डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यामुळे ट्रिपलसीट दुचाकीचालक, वाहन परवाना आणि कागदपत्रे नसणे, फ्रंटसीट वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. २७६ वाहनचालकांवर कारवाई करून ५५,२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात अाला अाहे. शनिवारी शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची बैठक घेऊन सहायक पाेलिस निरीक्षक एम.एन. मुळूक यांनी मार्गदर्शन केले होते. वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आणू नये. परमिट नसलेल्या वाहनचालकांनी परमिट घ्यावे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे काही वाहनधारकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कारवाईची माेहीम सुरू आहे.

-वाहतूक शाखेचेपाेलिस शहरात ठिकठिकाणी थांबून कारवाई करत अाहेत. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना सूचना दिल्या अाहे. संबंधितांनी सूचनांचे पालन केल्यास कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन मोहीम यापुढेदेखील सुरू ठेवली जाणार आहे. एम.एन.मुळूक, सहायक पाेलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

हातगाडीधारकांना केले आवाहन
रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या हटवण्याच्या सूचना डीवायएसपी नीलोत्पल यांनी दिल्या आहेत. पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या हातगाडीधारकांना थेट न्यायालयात पाठवले जाणार आहे. त्यामुळे हातगाडीधारकांनी रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने हातगाड्या लावू नयेत, असे आवाहन केले आहे.

पोलिस घालणार गस्त
रहदारीच्या मार्गांवर वाहतुकीला अडथळा निर्माण हाेईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर वाहतूक शाखेचे लक्ष राहणार आहे.रहदारीला अडथळा झाल्यास संबंधित वाहनचालकाविरुद्ध कारवाई केली जाईल. त्यासाठी जामनेर राेड, बाजारपेठ, बसस्थानक मार्ग, सराफ बाजार या भागांत माेटारसायकलवर पाेलिसांची गस्त सुरू ठेवली जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...