आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहर झाले हागणदारीमुक्त 4 हजार वैयक्तीक व सार्वजनिक शौचालये केली तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
जळगाव - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महापालिकेने संपुर्ण शहर हगणदारीमुक्त केले असल्याचा दावा आयुक्त जीवन सोनवणे यांनी मंगळवारी केला. शहरातील ५८ ठीकाणाी नागरीक उघड्यावर शौचास बसत होते. ही स्पॉट डिटेक्ट करून तेथील नागरीकांना वैयक्तीव व सार्वजनिक शौचालये तयार करून देण्यात आले आहेत.
 
राज्य शासनातर्फे २०१४ पासून स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवले जात आहे. त्या अनुशंगाने जळगाव शहर महानगरपालिकेने या अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. अभियानांतर्गत ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत शहर स्वच्छ करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतू ३१ मार्च पूर्वीच हे काम करण्याचा संकल्प महापालिकेने केला होता.
 
गेल्या वर्षी शहरातील ५८ ठीकाणे शोधण्यात आली. या जागांवर लोक उघड्यावर शौचास बसत होते. सुरूवातील गुड मॉर्निंग पथकाच्या मदतीने उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांना फुले देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर नागरीकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. वर्षभराच्या प्रयत्नानंतर जळगाव शहर हागणदारीमुक्त झाल्याचा दावा मंगळवारी आयुक्त सोनवणे यांनी केला आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा, गोलाणी मार्केटच्या पार्किंगमधून कारमधील साडे तीन लाख चाेरणारे जेरबंद...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...