आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्य पडताळणीप्रकरणी महिला पीएसअाय निलंबित, दाेन महिला पाेलिसांची मुख्यालयात बदली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चारित्र्य पडताळणी दाखल्यांच्या प्रकरणात एक महिला पाेलिस उपनिरीक्षकाला निलंबित, तर दाेन महिला कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करण्याची कारवाई केल्याचे जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले. या प्रकरणाची उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे प्राथमिक चाैकशी करणार अाहेत. 
 
पोलिस अधीक्षक कार्यालयात चारित्र्य पडताळणीचे दाखले अाॅनलाइन करण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चारित्र्य पडळताणीचे दाखले घेणाऱ्यांची माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत हाेती. या गर्दीचा फायदा घेत महिला पाेलिस उपनिरीक्षक सरला गाेपाल पाटील यांनी नंदिनीबाई विद्यालयाच्या बाहेर असलेल्या व्यापारी संकुलातील ‘लाॅग इन’ या खासगी सायबर कॅफेचा चालक विनाेद मुदमुले याच्याशी तोंडी संगनमत केले.
 
 ज्यांना जास्त घाई हाेती, त्यांना सायबर कॅफेवर पाठवले जात हाेते. त्या ठिकाणी पाचशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत पैसे घेऊन दाखले दिले जात हाेते. या विषयाचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने शनिवारच्या अंकात प्रकाशित केले हाेते. याप्रकरणी पाेलिस उपनिरीक्षक सरला पाटील यांना निलंबित करण्यात अाले अाहे. तर पाेलिस कर्मचारी सुनीता वराडे, हसीना तडवी यांची मुख्यालयात बदली करण्यात अाली अाहे. 
 
प्राथमिक चाैकशीचे आदेश 
- चारित्र्य पडताळणी दाखल्यांच्या प्रकरणात एक पाेलिस उपनिरीक्षक अाणि दाेन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात अाली अाहे. तर या प्रकरणाची प्राथमिक चाैकशी करण्याचे अादेश उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांना दिले. डाॅ.जालिंदर सुपेकर, जिल्हा पाेलिस अधीक्षक