आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल पंपांना रोज हवेत ५ लाख सुटे; मिळतात फक्त दीड लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील पेट्राेल पंपांवर चार दिवसांपासून सुट्या पैशांचा प्रश्न पुन्हा अवघड झाला अाहे. त्यामुळे विक्रीवर परिणाम हाेऊन १० ते १५ टक्के घट झाली अाहे. विशेष म्हणजे २० पेट्राेल पंपांवर दरराेज सुमारे लाख रुपयांची गरज असताना पंपांवर केवळ दीड लाख रुपये येत असल्याची स्थिती अाहे. यातून मार्ग काढण्यासाठी बहुसंख्य वाहनचालकांना स्वॅपचा पर्याय सुचवला जात अाहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदींनी १९ दिवसांपूर्वी ५०० १०००च्या नाेटा रद्द केल्याची घाेषणा केल्यानंतर त्यातून सर्वसामान्य अद्यापही सावरू शकलेले नाही. समस्यांना ताेंड देत निर्णयाचे स्वागत विराेध करत मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू अाहे. याचा परिणाम शहरातील पेट्राेल पंपचालकांसह वाहनधारकांनाही साेसावा लागत अाहे. शहरातील २० पेट्राेल पंपांना दरराेज सुमारे ते लाख रुपयांच्या सुट्या पैशांची गरज असते. यात ५० १०० रुपयांची गरज अधिक भासत असते.
परंतु ५०० १०००ची नाेट वाहनधारकांनी घेणे बंद केल्याने सगळ्यांनाच १००ची नाेट द्यावी लागत अाहे. यात केवळ १० ते २० टक्के लाेक सुटे पैसे देत असल्याने पेट्राेल पंपांवर फक्त एक ते दीड लाख रुपयेच सुट्या पैशांच्या स्वरूपात जमा हाेत अाहेत.

५००चीनाेट येताच सुटेल प्रश्न
सध्या नागरिकांकडे ५० १००च्या नाेटा असल्या तरी, बँक एटीएममधून माेठ्या प्रमाणात २०००च्या नाेटा बाहेर पडत अाहेत. त्यामुळे वाहनधारक या २०००च्या नोटचे सुटे व्हावेत, यासाठी लोक पेट्रोल पंपांवर या नाेटांचा वापर करतात. मात्र, त्यांच्याकडे देखील सुट्यांची समस्या असल्यामुळे ते सुटे उपलब्ध होईपर्यंत वाहधनारकांना पेट्राेल पंपावर थांबवून ठेवतात. मात्र, ही समस्या नवीन ५००च्या नाेटा हाती अाल्यानंतर संपेल, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.

हाॅटेलधारक घेताहेत टक्के चार्ज : शासनानेप्लास्टिक मनीचा वापर करणाऱ्या नागरिकांना काेणताही अतिरिक्त भार अाकारला जाणार नाही याची घाेषणा केली हाेती. परंतु अजूनही जळगाव शहरातील काही हाॅटेलचालक ग्राहकांकडून टक्के अतिरिक्त चार्जची अाकारणी करीत अाहे. विशेष म्हणजे यासंदर्भात बिलाची मागणी केल्यास तसे बिल देण्यास असमर्थता दर्शवत असल्याच्या तक्रारी वाढल्या अाहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तयारी काही वाहनधारकांनी दाखवली अाहे.

२०००च्या नाेटमुळे समस्या कायम
अातापर्यंत वाहन धारक ५०० १०००ची नाेट देत असल्याने त्यांना पैसे परत करताना थाेडी कसरत करावी लागत हाेती. परंतु, अाता वाहनधारक थेट २०००ची नाेट देत असल्याने पेट्राेल टाकल्यानंतर पैसे देताना माेठी अडचण येत अाहे. त्यामुळे पंपावरील कर्मचारी कितीची नाेट अाहे, हे अाधीच विचारून घेत अाहेत.

जेवढे पेट्राेल तेवढेच केले जाते स्वॅपिंग
शहरातील २० पेट्राेल पंपांपैकी बऱ्याच पेट्राेल पंपचालकांनीच स्वॅपची सुविधा उपलब्ध करून दिली अाहे. वाहनधारकांना किमान १०० रुपयांचे पेट्राेल टाकल्यानंतर स्वॅपिंगची सुविधा दिली जात अाहे. जेवढे पेट्राेल तेवढेच स्वॅप केले जाते. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत स्वॅपच्या सुविधामुळे प्लास्टिक मनीचा वापर वाढत अाहे.

विक्रीवर परिणाम
^नाेटबंदीच्या निर्णयानंतर शहरातील पेट्राेल पंपांवरील विक्रीवर परिणाम झाला अाहे. दरराेज ४० ते ५० हजार लिटर पेट्राेलची गरज भासते. त्या तुलनेत १० ते १५ टक्के परिणाम जाणवताेय. अाता २०००ची नाेटमुळे ग्राहकांना सुटे देताना माेठी कसरत करावी लागत अाहे. कारण पूर्वीच्या तुलनेत केवळ ३० टक्केच सुटे पैसे उपलब्ध हाेत अाहेत. प्रकाश चाैबे, अध्यक्ष, पेट्राेलपंप असाेसिएशन

अडचणीलवकर दूर व्हाव्यात
^गेल्या १०दिवसांत सुट्या पैशांची माेठी समस्या निर्माण झाली हाेती. दिवसभरात ५० १००च्या नाेटांचा अाकडा सुमारे २५ ते ३० हजारांच्या पुढे जात हाेता. परंतु ५०० १०००च्या नाेटा बंद झाल्याने १५ दिवसांत सुट्या पैशांचा भरणा ते हजारांवर पाेहोचला. प्रत्येक वाहनधारकाला सुटे देताना माेठी कसरत करावी लागली. ही समस्या लवकरच सुटेल. अशाेक पाटील, मॅनेजर, पलाेड सर्वाे इंटरप्राइजेस
बातम्या आणखी आहेत...