आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९२ पैकी २३ हद्दपारीच्या प्रस्तावांची प्रक्रिया पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सणाेत्सव,जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणून जिल्हा पाेलिस दलातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ९२ हिस्ट्रीशीटरचे हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात अाले हाेते. त्यापैकी केवळ २३ जणांचे प्रस्ताव पाठवले अाहेत, अशी माहिती िजल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी दिली.

एप्रिल ते ३० एप्रिल या एका महिन्यासाठी ९२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे प्रस्ताव अाहेत. सणाेत्सवात, जयंतीमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडून नये म्हणून शहरात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह पाेलिसांना काॅर्नर मीटिंग घेण्याचे अादेश दिले असल्याचे जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. सुपेकर यांनी सांगितले. तसेच गावठी दारूच्या भट्ट्यांवर कारवाईचे अादेश दिले.

दाेनपाेलिस ठाण्याचे प्रस्ताव
शहरातीलपाच पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपारीचे प्रस्ताव अाहेत. त्यापैकी शनिपेठ पाेलिस ठाण्याच्या ३० पैकी १७ अाणि रामानंदनगर पाेलिस ठाण्याच्या १८ पैकी प्रस्ताव बजावले. शहर पाेलिस ठाण्याचे २२, जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे १० अाणि एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे १२ प्रस्ताव प्रलंबित अाहेत.

जातीयतेढ निर्माण करणाऱ्या संघटनांवर लक्ष : जातीयतेढ निर्माण करून शांतता भंग करणाऱ्या संघटनांवर लक्ष ठेवण्यासाठी विशिष्ट यंत्रणा कार्यरत केली अाहे. जातीय तेढ निर्माण केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला अाहे.
जिल्हापाेलिसदलाने पाठविलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावांची प्रक्रिया सुरू अाहेत. काही प्रस्ताव पूर्ण करून पाठविले अाहेत. उर्वरित प्रस्ताव लवकरच पूर्ण करण्यात येणार अाहेत. अभिजित भांडे-पाटील, उपविभागीयअधिकारी