आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाेलिस ठाण्यात येणाऱ्या ‘पीअाय’वर कारवाई करू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वरिष्ठांना कळवता पाेलिस ठाण्यात गैरहजर राहणाऱ्या पाेलिस निरीक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नाशिक परीक्षेत्राचे पाेलिस महानिरीक्षक विनयकुमार चाैबे यांनी दिला.
जळगाव उप विभागातील पाेलिस ठाण्यांचे पाेलिस निरीक्षक (प्रभारी अधिकारी) हजर राहत नसल्याचे अनेक वेळा समाेर अाले अाहे. काही अधिकारी तर घरूनच पाेलिस ठाणे चालवतात. मंगळवारी जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयात एनडीअारएफच्या जवानाने गाेंधळ घातला हाेता. त्याला जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात घेऊन गेले हाेते. पाेलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुबेर चवरे त्या वेळी पाेलिस ठाण्यात हजर नव्हते. उप विभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी स्वत: पाेलिस ठाण्यात जाऊन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. मात्र, तरीही चवरे अालेले नव्हते. या विषयी पत्रकारांनी विनयकुमार चाैबे यांना विचारलेल्या प्रश्नानंतर त्यांनी अाश्चर्य व्यक्त केले. त्यांनी पाेलिस अधीक्षक डाॅ. सुपेकर यांना या विषयी तत्काळ चाैकशी करून अहवाल देण्याची सूचना केली. चाैकशीत दाेषी अाढळणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे अाश्वासन त्यांनी दिले. पत्रकार परिषदेला जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, अपर पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर उपस्थित हाेते.

मनपाला बंदाेबस्त पुरवणार
जळगाव मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे सुरू असलेल्या कारवाईत अनेकवेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेताे. मात्र, अार्थिक विवंचनेत असलेली मनपा बंदाेबस्ताचे शुल्क देऊ शकत नाही. अशा वेळी बंदाेबस्त देणार काय? या प्रश्नावर चाैबे म्हणाले की, मनपा शासकीय यंत्रणा अाहाेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ताे हाताळणे अामची जबाबदारी अाहे. मनपाला जेव्हा गरज लागेल तेव्हा बंदाेबस्त देऊ.
बातम्या आणखी आहेत...