आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी गटनेता निवडीचे राजकारण पेटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मनपात राष्ट्रवादीतील गटबाजीचे राजकारण जाेरदार पेटले अाहे. महासभेत सुरेश साेनवणे यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात अाले. परंतु, विद्यमान गटनेत्या दीपाली पाटील यांनी महापाैरांना पत्र देऊन गटनेता बदलाचा विषय तहकूब ठेवण्याची मागणी केली अाहे.
महासभेत महापाैरांकडे अालेल्या पत्रानुसार खाविअाचे गणेश बुधाे साेनवणे राष्ट्रवादीचे सुरेश साेनवणे यांच्या नावाची घाेषणा करण्यात अाली. त्यानंतर काही वेळात दीपाली पाटील यांनी महापाैरांना पत्र दिले अाहे. त्यात राष्ट्रवादीच्या अाठ नगरसेवकांनी सुरेश साेनवणे यांच्या नावाला विराेध केला अाहे. याबाबत जिल्हाध्यक्ष डाॅ.सतीश पाटील यांनाही सांगितले असून ते यासंदर्भात बैठक घेणार अाहेत. त्यात गटनेत्यासंदर्भात निर्णय हाेईल. त्यामुळे गटनेतापदाचा विषय तहकूब ठेवावा, अशी मागणी केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...