आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीजपुरवठा रात्रभर खंडित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मान्सूनपूर्व वीजपुरवठ्याचे नियोजन करणाऱ्या क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे पहिल्याच वादळीवाऱ्यात नियोजन कंपनीची यंत्रणा सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अपयशी ठरली आहे. परिणामी, शहरातील बहुतांश भागात वीजपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
रविवारी रात्री झालेल्या वादळीवाऱ्यामुळे शहरातील महाबळ कॉलनी, मोहननगर, दीक्षितवाडी, सुयोग कॉलनीसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी तारांसह कंडक्टर तुटण्याचे प्रमाणही अधिक होते. या कामांच्या दुरुस्तीस दोन ते तीन तासांचा अवधी पुरेसा असतानाही सकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. शहरासह तालुक्यास वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीने मान्सूनपूर्व नियोजन करीत झाडांच्या फांद्या छाटणे, तार बदलणे, नवीन कंडक्टर बसवणे आदी कामे हाती घेतली होती. मात्र, पहिल्याच हलक्या वादळीवाऱ्यात यंत्रणेचे नेहमीचे रूप समोर आले. वीजपुरवठा खंडित होताच कंपनीचे कॉलसेंटरचे नंबरही बंदच राहिले.
कॉल सेंटरवर तक्रारी स्वीकारल्या जात नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. मान्सून वेगाने आल्यास यावर क्रॉम्प्टन नियंत्रण मिळवेल का? असा प्रश्नही ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...