आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रधानमंत्री’याेजनेंतर्गत घराचे स्वप्न हाेणार पूर्ण, पाचाेरा तालुक्यात 613 लाभार्थ्यांची निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचाेरा - हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतु, असंख्य गरीब कुटुंबीय स्वप्नातील घर पूर्ण करू शकत नाही. प्रधानमंत्री अावास योजनेंतर्गत मात्र तालुक्यातील ६१३ लाभार्थींना हक्काचे घर मिळणर अाहे. या याेजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:ची जागा हवी. बांधकामासाठी शासनाकडून अनुदान मिळेल. 
 
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी प्रधानमंत्री अावास योजनेंतर्गत प्रत्येक भारतीयाचे स्वत:चे घर असावे, यासाठी महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला अाहे. त्यामुळे लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात अाले हाेेते. पाचाेरा तालुक्यात या याेजनेच्या लाभासाठी सर्व्हेक्षण करण्यात अाले हाेते. यात पहिल्या टप्प्यात जवळपास एक हजार लाभार्थींचा समावेश करण्यात अाला. त्यातील निवड झालेल्या ६१३ लाभार्थ्यांना घरे मिळणार अाहे. उर्वरित लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात घरे देण्यात येतील. ज्याच्या नावावर स्वत:चे घर नाही, अशाचा अर्जदारांना या याेजनेचा लाभ दिला जात अाहे. 
 
तालुक्यात अल्पसंख्यांकांसाठी १७३, अनुसुचित जाती जमातीसाठी १०८, अनुसुचित जमातीसाठी ९२ ‌इतरांसाठी २४० असे ६१३ लाभार्थ्यांना पंतप्रधान अावास याेजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल. केंद्र शासनाच्या प्रपत्र नुसार ज्या लाभार्थींच्या नावाचा यादीत समावेश असेल, ज्यांचे अाधारकार्ड असेल अशा व्यक्तींनी ग्रामसेवकाशी संपर्क साधून पंतप्रधान अावास याेजनेचा लाभ मिळवून घ्यावा, असे अावाहन पंचायत समिती गटविकास अधिकारी गणेश परदेशी केले अाहे. 
 
अाॅनलाइन अर्ज भरणार 
याेजनेचा लाभ देताना पारदर्शीपणा रहावा, यासाठी शासनाने अाॅनलाइन अर्ज मागवले अाहे. त्यातून अर्ज अचूक भरावयाचा अाहे. घर बांधण्यासाठीचे अनुदानही अाॅनलाइन पद्धतीने बँकेत जमा हाेईल. पैसे घेऊन काेणी घरच बांधले नाही तर अशाविरुद्ध पाेलिसांत फाैजदारी गुन्हा दाखल हाेणार अाहे. 
 
अर्जदारांची जाेरदार लाॅबिंग 
घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी अर्जदारांची जाेरदार लाॅबिंग सुरू अाहे. त्यासाठी काही राजकीय पदाधिकाऱ्यांचे शिफारसपत्र जाेडण्यात येत असून नियमानुसारच या याेजनेचा लाभ देण्यात येईल. अर्जदारांनी एजंटपासून सावध रहावे, असे अावाहनही गटविकास अधिकाऱ्यांनी केले अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...