आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद न्यायालयात, तडजाेड पोलिस ठाण्यात,साेनवणे खून खटल्यात दोन्ही गटांत वाद हाेण्याची तिसरी घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रशांत सोनवणे खून खटल्याच्या कामासाठी समोरासमोर आलेल्या फिर्यादी संशयितांच्या कुटुंबीयांमध्ये शुक्रवारी न्यायालयात जोरदार वाद झाला. मात्र, दोन्ही गटांनी माघार घेतल्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही. नंतर दाेन्ही गटांनी पोलिस ठाण्यात तडजाेड केली.

प्रशांत सोनवणे खून खटल्याचे कामकाज शुक्रवारी न्यायालयात सुरू होते. या वेळी फिर्यादी राधाबाई सोनवणे या मुलासह तेथे आल्या. तसेच संशयित प्रल्हाद सोनवणे हेदेखील कुटुंबीयांसह हजर होते. हे दोन्ही गट समोरासमोर अाल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. दाेघांनी परस्परांना शिवीगाळ, धमक्या दिल्यामुळे न्यायालयात गोंधळ उडाला. या प्रकारामुळे काही मिनिटांसाठी न्यायालयाचे कामकाज थांबले. तथापि, पोलिसांनी मध्यस्थी करून वाद थांबवला. त्यानंतर राधाबाई, त्यांचा मुलगा, प्रल्हाद सोनवणे विलास सोनवणे हे दोघे भाऊ शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. या वेळी दोन्ही बाजूंचे म्हणणे एेकून घेत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली. मात्र, त्यानंतर काही वेळातच दोन्ही फिर्यादींनी माघार घेत वाद आपसात मिटवला. त्यामुळे कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही.
बातम्या आणखी आहेत...