Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Pravin Mali Murder The Two Friend In Jalgaon

जळगाव - ब्लेडचे वार पाहून प्रवीणला संपवण्याची शपथ, दाेन वर्षांपूर्वी झाली हाेती हाणामारी

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 09:12 AM IST

  • जळगाव - ब्लेडचे वार पाहून प्रवीणला संपवण्याची शपथ, दाेन वर्षांपूर्वी झाली हाेती हाणामारी
जळगाव-शनिपेठेत बुधवारी पहाटे पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात अाली. या प्रकरणातील संशयित राहुल सपकाळे याला अासाेदा येथून तर मुख्य संशयित पंकज वाणी याला घटना घडल्यानंतर १८ तासांत म्हणजे बुधवारी रात्री मुंबईतून अटक केली. मृत प्रवीण माळी याने दाेन वर्षांपूर्वी मारहाण करून चेहऱ्यावर ब्लेडने वार केले हाेते. ते व्रण अजूनही पंकजच्या चेहऱ्यावर अाहेत. दरराेज अारशात व्रण बघितल्यानंतर मी प्रवीणला संपवण्याची शपथ घेत असल्याची कबुली पंकज वाणी याने पाेलिस चाैकशीत दिली. दरम्यान, दाेघांना गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गाेरे यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी २३ एप्रिलपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली अाहे.
शनिमंदिराजवळील अाेंकार वाणी यांच्या घराच्या तळमजल्यात प्रवीण सुरेश माळी याचा भीमा ऊर्फ पंकज अशाेक वाणी अाणि राहुल जयराम सपकाळे यांनी फरशीने ठेचून खून केला. पाेलिसांनी बुधवारी राहुल सपकाळे याला अासाेदा रस्त्यावरून अटक केली. मुख्य संशयित पंकज हा बुधवारी पहाटे घरी गेला. त्याने त्याच्या अाईला भुसावळ येथे पाठवले. त्यानंतर जळगावला थांबणाऱ्या एका एक्स्प्रेस रेल्वेने मुंबईकडे पसार झाला. बुधवारी दुपारी २ वाजता तो कल्याण येथे उतरून जेवला. त्यानंतर ताे छत्रपती शिवाजी टर्मिनसला गेला. त्या ठिकाणी जुन्या मित्रांना भेटला. सहज फिरण्यासाठी अाल्याचे त्याने सांगितले अाणि त्याच ठिकाणी ताे फसला.
पाेलिसांना ताे मुंबईत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे, शनिपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अात्माराम प्रधान यांनी सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, विनाेद मराठे, विजयसिंग पाटील, जितेंद्र साेनवणे, नरेंद्र ठाकरे, माेतीराम पाटील, प्रफुल्ल धांडे, मिलिंद कंक, दुष्यंत खैरनार, अमित बाविस्कर यांना तपासासाठी पाठवले हाेते. त्यांनी बुधवारी रात्री १० वाजता सीएसटी रेल्वेस्थानकातून पंकजला ताब्यात घेतले. दाेघांना न्यायालयात हजर केले. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी तर संशयितातर्फे अॅड. एस. सी. पावसे यांनी काम पाहिले.
पाेलिसांनी बँक खाते केले होते सील
खून केल्यानंतर पंकज विसनजीनगरातील त्याच्या घरी गेला. अाई सुमन यांच्याकडून १ हजार रुपये घेऊन निघून गेला. त्याला तात्पुरते पैसे हवे हाेते. कारण त्याच्या स्टेट बँक अाॅफ इंडियाच्या खात्यात ९ लाख रुपये हाेते. ताे एटीएमने नव्हे तर ग्राहक सेवेच्या माध्यमातून पैसे काढत हाेता. त्याच्या खात्यात पैसे असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिस निरीक्षक अात्माराम प्रधान यांनी बँक खाते सील करण्याचे अादेश दिले. काही मिनिटातच त्याचे बँक खाते सील झाले. त्यामुळे त्याचे उर्वरित मार्गही बंद झाले हाेते.
प्रवीण अाणि पंकज हे दाेघे मित्र हाेते. दाेन वर्षांपूर्वी गल्लीतील एक मुलगी तुला चिडवते, असे प्रवीणने पंकजला सांगितल्यानंतर दाेघांमध्ये वाद झाला हाेता. त्यानंतर हाणामारी हाेऊन प्रवीणने पंकजच्या गालावर अाणि मानेवर ब्लेडने वार केले हाेते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा प्रवीणने पंकजला मारहाण केली हाेती. त्याचा राग पंकजच्या मनात हाेताच. शिवाय त्याच्या चेहऱ्यावरील ब्लेडचे वार त्याला दरराेज अाठवण करून देत हाेते. मित्रही नेहमीच मार खाल्ल्याने हिणवत हाेते. मंगळवारी रात्रीही त्याच कारणावरून पुन्हा वाद झाला. त्यामुळे प्रवीणला संपवण्याचा निर्धार करून पंकजने त्याचा खून केला.

Next Article

Recommended