आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालसंशोधकांनी 94 शोधनिबंधांचे केले सादरीकरण, बालविज्ञान संमेलनाचे फलित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याप्रमाणेच बालसंशोधकांनी ९४ शोधनिबंध सादर करून आपल्यातील संशोधनवृत्ती संमेलनात दाखवली. यातील २२ शोधनिबंधांना बक्षिसेही देण्यात आली.
जळगावात आठव्या राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे उद््घाटन झाले. या संमेलनात राज्यभरातून सुमारे १०० संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, यात ९४ शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. त्यातील २२ शोधनिबंधांना बक्षीस देण्यात आले, तर ते ७२ वर्गांत सादर करण्यात येणार आहेत. ‘बदलत्या जीवनशैलीनुसार बदलता आहार’, ‘अन्नधान्य साठवण : समस्या उपाय’, ‘कचऱ्यातून सोने’, ‘मानवी जीवनावर धूलिकणांचा होणारा परिणाम’, ‘अपघातांचे व्यवस्थापन’, ‘गणितीय साहित्यनिर्मिती’, ‘गुटखा : एक ज्वलंत समस्या’, ‘रंगांमुळे घराच्या तापमानात बदल’, ‘खारफुटी वनस्पतीची जैवविविधता’ यासारख्या मानवांना उपयोगी विषयांवर विद्यार्थ्यांनी शाेधनिबंध सादर केले आहेत. तसेच शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठीसुद्धा विविध विषयतज्ज्ञ आलेले होते. काही विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग सादर केले. यात पदार्थांमधील प्रथिने ओळखणे, बल्बचा वापर करून अंतर्वक्र बहिर्वक्र भिंग तयार करणे, विविध द्रवांमध्ये वस्तूंची घनता तपासणे यासारखे प्रयोग होते. संमेलनस्थळी प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या दालनांमध्ये सेशन घेण्यात आले. रविवारी सकाळी वाजता जैन इरिगेशन कंपनीच्या आवारात ‘विज्ञान सहल’ आयोजित करण्यात आली आहे.
यांना मिळाली बक्षिसे
महाविद्यालयीन गट: द्वितीय-नेहा सोनवणे यशराज कोठावदे, तृतीय- पूजा ताळे रोहिणी येऊल, उत्तेजनार्थ- मयूरी गवई, बिपीन काकडे, शरयू बढे, ऋतिक भोयर, ज्योत्स्ना इंगळे, प्रतीक्षा वानखेडे, प्रतीक्षा रेखाते, वैष्णवी रेखाते.

शालेय गट : प्रथम-निशांत मातले गौरव पाटील, द्वितीय- भूषण बोरनारे रोहन इंगळे, तृतीय- सानिया हवालदार प्रणाली सोनवणे, उत्तेजनार्थ- तेजस वऱ्हाडे, भूषण पाटील, प्रणव भदाणे, संकेत कोठावदे, पार्थ ढोबळे, दूर्वेश चौधरी, दिव्य थूल, एेश्वर्या मुंडे, साक्षी हिवराळे, स्वाती वगरे, प्रवीण सोनवणे, स्नेहा चोरघे, पूजा फुपाटे, सीमा दसाणा, सर्वेश कुळकर्णी, दिग्विजय बाबर, रेणू भगत, सुरभी देशपांडे, प्रतीक निकुंभ, हेमांग बऱ्हाटे, शुभम नेहते, संकेत चौधरी, तेजस सोनार.
बालविज्ञान संमेलनात संशाेधन सादर करताना बालसंशाेधक.
वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन
संमेलनात सहभागी विद्यार्थी, शिक्षक, पालक नागरिकांसाठी वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन शनिवारी भरवण्यात आले होते. नूतन मराठा महाविद्यालयाच्या दुर्गा ठाकूर, हेमंत चव्हाण, टेनल महाजन श्रद्धा पाटील या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक खेळण्यांची माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...