आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन चाकींसाठी घेतला दुचाकीचा अाधार; पॅकिंग भाेजनासाठी झुंबड, दिव्यांग वाऱ्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - सकाळी एसटी बसमधून अालेल्यांना मंत्री स्टेजवर असेपर्यंत सुविधा मिळाल्या. मात्र, भाषणबाजीनंतर मंत्री परतताच दिव्यांगांच्या हालाला पारावार राहिला नाही. मिळालेल्या तीनचाकी सायकली माेटारसायकलच्या मदतीने घेऊन जाण्याची वेळ अाली. त्याचवेळी रिक्षातही तीनपेक्षा जास्त सायकली काेंबून नेण्यात अाल्या. एसटी बसमध्ये अालेल्या दिव्यांगांना या सायकली नेमक्या ठेवाव्या कुठे, असा प्रश्न पडला. एनसीसीच्या मुलांनी मदतीचा हात दिला. मात्र, ताेही कमी पडला. सरकारी यंत्रणा मात्र या काळात सुस्तावलेली हाेती. त्या वेळी पॅकिंग करून अाणलेल्या भाेजनावर एकच झुंबड उडाली. अगदी लहान मुलेही हातात, डाेक्यावर पाच ते सात प्लेट पॅकिंग भाेजन घेऊन जाताना दिसले. काही महिलांनी तर या भाेजनासह पाण्याच्या बाटल्याही नेल्या. भाेजनानंतर ठिकठिकाणी खरकट्या प्लेटही टाकलेल्या दिसून अाल्या. 
 
जिल्हा क्रीडा संकुलात मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. अकरा वाजून दहा मिनिटांनी सुरू झालेला कार्यक्रम ७० मिनिटांनी म्हणजे १२ वाजून वीस मिनिटांनी संपला. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना साहित्य वाटप केले गेले. त्यानंतर मैदानात स्टाॅल लावून शिबिरनिहाय निवड झालेल्या लाभार्थ्यांना साहित्य वाटपाची व्यवस्था केली गेली हाेती. मात्र, मंत्र्यांपाठाेपाठ जबाबदार अधिकारीही कार्यक्रम स्थळावरून निघून गेल्यानंतर या ठिकाणी गाेंधळ उडाल्याचे दिसून अाले. लाभार्थ्यांनी साहित्य घेण्यासाठी स्टाॅलवर रांगा लावल्या हाेत्या. या लाभार्थ्यांना सकाळी एसटी बसमधून अाणण्यात अाले हाेते. त्यांना बसमधून उतरून कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यासाठी एनसीसीच्या स्वयंसेवकांनी मदत केली. सकाळी १० वाजेपासून अालेले हे स्वयंसेवक दुपारी थकले. त्यामुळे साहित्य वाटप झाल्यावर लाभार्थ्यांनाच अापले साहित्य न्यावे लागले. तर काही एनसीसी स्वयंसेवकांकडून गरजंूना मदत केली गेली. एकीकडे साहित्य घेऊन जाणाऱ्या लाभार्थ्यांची लगबग तर दुसरीकडे याठिकाणी वाटण्यात अालेल्या खाद्यपदार्थांचे पाकीट मिळवण्यासाठी परिसरातील काही महिला, मुलांनी मैदानावर प्रवेश केल्याने नेमके लाभार्थी काेण अाणि बाहेरील काेण हे अायाेजकांना अाेळखणे कठीण झाले. 

लाभार्थी नसलेल्या अनेकांनी संबंधितांकडे लाभार्थी असल्याचे भासवत एकापेक्षा अधिक खाद्यपदार्थांचे पाकीट घेतल्याचे या ठिकाणी दिसून अाले. त्यात प्रामुख्याने महिला अाणि लहान मुलांचा समावेश हाेता. डाेळ्यांदेखत एकच व्यक्ती चार ते पाच खाद्यपदार्थांचे पाकीट घेऊन जात असल्याचे दिसत असतानाही त्यांना काेणीही राेखत नव्हते. लाभार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्यापासून खाद्यपदार्थ जागेवर देण्याची व्यवस्था हाेती. मात्र, मंत्र्यांच्या गमनानंतर उडालेल्या गाेंधळामुळे लाभार्थींपैकी काहींनी खाद्यपदार्थ, पाण्यासाठी स्टाॅलकडे धाव घेतली. या सर्वांमुळे पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, इतर कचरा मैदानावरच फेकला. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गाेळा करण्यासाठी काहींनी गर्दी केली. त्यामुळे दुपारी गाेंधळ उडाला. मात्र, काेणीही जबाबदार अधिकारी नसल्याने नेमका काेणी वाईटपणा घ्यावा, असा प्रश्न उपस्थितांमध्ये निर्माण झाल्याने तेही हाेणारा गाेंधळ पाहत राहिले. 
 
गर्दीमुळे वाहतुकीला अडचण... 
पाेलिस,लाभार्थ्यांच्या बसेस, अधिकारी, मंत्र्यांच्या वाहनांची वर्दळ सुरू हाेती. कार्यक्रमासाठी अालेल्यांकडूनही वाहने मैदानाबाहेर लावण्यात अाली हाेती. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्यांना अडचणींना ताेंड द्यावे लागले. मात्र मंत्र्यांच्या गाड्या जाताच संबंधित कर्मचारीही परिसरातून गायब झाल्याचे दिसून अाले. 
 
साहित्य नेताना अाल्या अडचणी 
काहीजणांना लवकर साहित्य मिळाले. तर त्यांच्यासाेबत अालेल्यांना साहित्य मिळण्यास वेळ होता. त्यामुळे काही जणांनी घरी जाण्याची घाई केली. त्यात नेमके साहित्य कसे न्यावे हा प्रश्न हाेता. काहींनी खासगी अॅपेरिक्षा, रिक्षासह दुचाकीवरही साहित्य नेले. काही जण क्रीडांगणाच्या परिसरातच साहित्यासह बसून असल्याचे दिसून अाले. 
 
मैदानाचे नुकसान 
मैदानावर माेठ्या अाकाराच्या मंडपाची उभारणी केली गेली हाेती. लाेखंडी पाइपच्या मदतीने उभारण्यात अालेल्या मंडपासाठी मैदानावर खाेदकाम झाले. त्यामुळे मैदान खराब झाले. त्यात उष्टे अन्न अाणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या अनेकांकडून मैदानावर फेकण्यात अाल्याने सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली हाेती. प्लास्टिक अावरण, पुठ्ठे अादी मैदानावर टाकले गेल्याने त्यात अधिक भर पडली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...