आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमधील हत्याकांडाचा निषेध, राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केरळमधील हत्याकांडाचा निषेध नोंदवताना राष्ट्रीय सुरक्षा मंचचे सदस्य. - Divya Marathi
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केरळमधील हत्याकांडाचा निषेध नोंदवताना राष्ट्रीय सुरक्षा मंचचे सदस्य.
जळगाव - केरळ राज्यात विशेषत: कन्नूर जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी चालवलेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा मंच जळगावतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली.
 
या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत असलेले हल्ले हत्यांच्या घटनांचा तीव्र शब्दात निषेध केला.या निषेध सभेला आमदार हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, महापौर नितीन लढ्ढा यांची उपस्थिती होती. या हल्ल्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 
 

निवेदनात म्हटले आहे की, केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत असलेले हल्ले हत्या होत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत तसेच डाव्यांचे सरकार केरळमध्ये सत्तेत आल्यानंतर हिंसक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. पालघाट जिल्ह्यातील कांजीकोडे येथे भाजप राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या घरांवर हल्ले करण्यात येत आहेत.
 
या वेळी सचिन नारळे, सुधा खटोड, मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा.रमेश महाजन, अॅड.प्रदीप कुलकर्णी, डॉ.प्रताप जाधव, दिलीप पाटील, जिल्हा संघ चालक राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून हल्ले हत्यांचा निषेध केला. 
 
बातम्या आणखी आहेत...