आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ : 4,431 रेल्वे प्रवाशांना दोन दिवसांत 26 लाखांचा परतावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी (दि.२९) झालेल्या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाला माेठ अार्थिक फटका बसला. विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे अनेक प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन पुढे ढकलले. त्यामुळे २९ आणि ३० ऑगस्ट या दोन दिवसात भुसावळ विभागातील हजार ४३१ प्रवाशांनी तिकिटे रद्द केली. दाेन दिवसात रेल्वेने या प्रवाशांना २६ लाख ७३ हजार ६७२ रूपयांचा परतावा दिला. 
 
वाशिंदजवळ मंगळवारी सकाळी अपघात झाल्याने विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग ऐनवेळी बदलण्यात आले. अपघाताला पाच दिवसांचा कालावधी झाल्यानंतरही गाड्या रद्द होण्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. शुक्रवारी याच पार्श्वभूमीवर ऐनवेळी पुष्पक एक्स्प्रेस भुसावळातून परत लखनऊला पाठवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या प्रकारामुळे भुसावळ स्थानकावर अडीच तास गोंधळ झाला होता. अद्यापही अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलत असल्याने बहुतांश प्रवासी आरक्षित तिकिटे रद्द करत आहेत. त्यामुळे पहिल्या दाेन दिवसात रेल्वेला माेठा आर्थिक फटका बसला. रेल्वे प्रशासनाने विभागातील मोठ्या स्थानकांवरील प्रत्येक तिकीट खिडकीवर तिकीट रद्द करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली हाेती. त्यामुळे तिकिटे रद्द करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळली. खिडक्यावर तिकीटे रद्द करण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. एेनवेळी गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना बसेसचा अाधार घ्यावा लागत अाहे. नाशिक येथून मुंबई, कल्याणसाठी जादा बसेस साेडण्यात अाल्या अाहेत. 
 
स्थितीत सुधारणा 
दाेन दिवसांनंतर तिकीट रद्द करण्याचा अाेघ कमी झाला अाहे. गाड्यांच्या मार्गात बदल केला असला तरी प्रवासी रेल्वेनेच प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे रेल्वे दळणवळणाची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, रद्द केलेल्या तिकिटांची आकडेवारी... 
बातम्या आणखी आहेत...