आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे प्रवासामध्ये ९२ पैसे भरून घेता येतो अपघाताचा विमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विमा कंपनीच्या प्रतिनिधीचा फाेन अाला की, सर्वजण त्याला काहीना काही कारण सांगून टाळतात. कारण हप्ता भरणे अनेकांना कठिण जाते. मात्र, आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास विमा योजना सुरू केली. अवघ्या ९२ पैशांत प्रवाशांचा विमा निघतो. रेल्वे अपघातात विमाधारक प्रवाशांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून तर आर्थिक मदत मिळेल, शिवाय आयआरसीटीसीकडून १० लाखांची आर्थिक मदत मिळते. विम्याची रक्कम नगण्य असूनही अनेक प्रवाशांना याची माहिती नसल्याची बाब समाेर अाली अाहे. केवळ १० ते २० टक्केच प्रवासी या याेजनेचा लाभ घेत आहेत.
या प्रवास विमा याेजनेचा लाभ घेणाऱ्यात वातानुकूलित दर्जाच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. स्लीपर क्लासच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांमध्ये मात्र या याेजनेविषयी अजूनही जागरूकता झालेली नाही. सामान्य प्रवाशांमध्ये विम्याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. अवघ्या ९२ पैशांत मिळणारा हा विमा सर्वात स्वस्त विमा आहे. देशात रोज अडीच ते तीन कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. यापैकी सुमारे ६० टक्के प्रवासी ऑनलाइन तिकीट काढतात. तर ४० टक्के प्रवासी आरक्षण केंद्रावरून काढलेल्या तिकिटावर प्रवास करतात. ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांपैकी २० टक्केच प्रवासी विम्याचा पर्याय निवडतात.

इंदूर-पटणा एक्स्प्रेसमध्ये १२८ जणांनीच काढला हाेता प्रवासी अपघात विमा
उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ इंदूर -पटणा एक्स्प्रेसचा २० नाेव्हेंबरला भीषण अपघात झाला. यात १४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या गाडीत ६९४ प्रवासी ऑनलाइन तिकिटावर प्रवास करत होते. यापैकी केवळ १२८ प्रवाशांनीच प्रवासी विम्याचा पर्याय निवडला होता. हे बहुतांश वातानुकूलित डब्यातील प्रवासी होते.

लवकरच सुविधा देणार
^सध्या विम्याची सुविधा केवळ ऑनलाइन तिकीट साठीच आहे. मात्र, लवकरच रेल्वे प्रशासन अारक्षण खिडकीवरही सुविधा सुरू करणार अाहे. विम्याचा लाभ घेणे एेच्छीक अाहे. अजून अनेक प्रवाशांना या याेजनेसंदर्भात माहिती नाही. त्यामुळे जनजागृतीचे काम सुरू अाहे. राजेंद्रपाटील, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

केवळ ऑनलाइन तिकीट काढताना ऐच्छिक विम्याचा पर्याय उपलब्ध
केवळ ऑनलाइन तिकीट काढताना ऐच्छिक विम्याचा पर्याय निवडता येताे. हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला अतिरिक्त ९२ पैसे द्यावे लागतात. विमा काढला तर अपघातात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला अथवा अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई आयआरसीटीसीतर्फे देण्यात येते. तात्पुरत्या स्वरुपाचे अपंगत्व आल्यास साडेसात लाख रुपयांची भरपाई तसेच जखमी झाल्यास दाेन लाख रुपयांपर्यंतची भरपाई मिळते. तसेच साहित्य चोरीला गेल्यावरही भरपाई मिळते.
बातम्या आणखी आहेत...