आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, अायुक्तांची व्हिसी; शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल बांधकामास दोन मिनिटात मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई येथील बैठकीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीद्वारे पुलाबाबत आढावा सादर करताना आयुक्त जीवन सोनवणे. - Divya Marathi
मुंबई येथील बैठकीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीद्वारे पुलाबाबत आढावा सादर करताना आयुक्त जीवन सोनवणे.
जळगाव - शिवाजीनगरात १०२ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सध्या कमकुवत झालेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाविषयी मंगळवारी दुपारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, मनपा आयुक्त यांची व्हिसी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) झाली. दाेन मिनिटाच्या व्हिसीमध्ये दीड मिनिटे अायुक्त जीवन साेनवणे यांनी पुलाचा अाढावा मांडला. त्यानंतर पुढील अर्धा मिनिटात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पुलाच्या कामासाठी केंद्राकडून ५० मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी राज्य शासनाकडून ५० टक्के निधी देण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे अार्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला अाता एक रुपयादेखील खर्च करण्याची गरज भासणार नाही. तर पूल हाेणार असल्याने अर्धा जळगावकरांची माेठी समस्या सुटणार अाहे.
 
वर्षांनुवर्षांपासून भिजत पडलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामांसंदर्भात आढावा घेण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासोबत व्हिडिओ काॅन्फरन्सिंगव्दारे बैठक घेतली. दुपारी वाजता बैठकीला सुरुवात झाली. आयुक्त सोनवणे यांनी पुलाबाबत अाढावा मांडला. यात त्यांनी सांगितले की, शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल अत्यंत धोकादायक झाल्याने त्यावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी पालिकेची आर्थिक स्थिती नसल्यामळे रेल्वे विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये रेल्वे विभाग महापालिका मिळून पुलाचे काम करणार होते. त्या वेळी २० कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली होती; पण यात पालिकेला देखील काही पैसा खर्च करावा लागणार होता. परंतु सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे रेल्वे विभाग राज्य शासनानेच हा खर्च करावा, अशी विनंती तथा प्रस्ताव अायुक्तांनी रेल्वेमंत्री मुख्यमंत्र्यांना केली. दीड मिनिटात सोनवणे यांनी अाढावा सादर केल्यानंतर पुढील अर्धा मिनिटात केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्तांच्या तोंडी प्रस्तावाला थेट मंजुरी दिली. त्यामुळे दोन मिनिटात शिवाजीनगर पुलाच्या बांधकामाचा माेठा विषय मार्गी लागला आहे. 
 
पुढे काय? 
रेल्वेप्रशासन आता कामासाठी निविदा मागवेल. त्यानंतर पुलाचे डिझाइन तयार करून त्याला मंंजुरी घेतली जाईल. नंतर प्रत्यक्षात उड्डाणपुलाच्या कामास सुरूवात होईल. 
गेल्या वर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. या घटनेनंतर केंद्र राज्यशासनाने महाराष्ट्रातील सर्व पुलांचा आढावा घेऊन सध्या त्यांची काय स्थिती आहे, त्यांना खरंच दुरुस्तीचा आवश्यकता आहे का, हे तपासून पुलाचा प्रश्न मार्गी लावणे सुरू केले आहे. याच अंतर्गत शिवाजीनगर पुलाचा देखील प्रश्न मार्गी लागल्याने या पुलाचे एक प्रकारे भाग्यच उजाळले आहे. 
 
महाड येथील दुर्घटनेनंतर पुलांचे काम वेगात 
शिवाजीनगर येथील हाच तो १०२ वर्षापूर्वी उभारण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल. 
 
काय आहे पुलाची सध्याची स्थिती? 
उड्डाणपुलाचे बांधकाम हे १०२ वर्षे पूर्वी झाले आहे. पुलाच्या पिलरला मोठ-मोठे तडे गेले आहेत. पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असल्याने याठिकाणी क्राॅसबार बसवण्यात अाले अाहे. 
 
असे होणार काम 
उड्डाणपुलाचेहीकाम रेल्वे विभाग राज्यशासन करणार आहे. या कामासाठी २०१३ मध्ये २० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता त्यात काही रक्कम वाढणार आहे. संपूर्ण खर्चाच्या ५० टक्के रक्कम केंद्र ५० टक्के रक्कम राज्य शासन देणार आहे. दाेन रेल्वे लाइन तिसरी अाणि चवथीवरून पूल बांधण्यात येणार अाहे. पुलाच्या दोन्ही बाजूने अप्रोच रोड तयार करण्यात येणार आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, निम्म्या शहराची समस्या लागली मार्गी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...