आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामजन्मभूमी हा तर आस्थेचा विषय; निवडणूक मुद्दा नकोच, साध्वी डॉ. प्राची यांचे आडगाव येथील धर्मसभेत आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - हिंदूधर्म अतिशय प्राचीन असून प्रभु श्रीराम या धर्मियांचे आराध्य दैवत आहे. तरीही श्रीराम त्यांच्या जन्मभूमीवरच प्रश्न निर्माण करण्यात येतो. सरकारने राम जन्मभूमीचा विषय निवडणूक मुद्या करू नये. त्याऐवजी समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी साध्वी डॉ.प्राची यांनी शनिवारी केली. तालुक्यातील आडगाव येथील धर्मसभेत त्या बोलत होत्या. देशभरातील संत-महंतांची उपस्थिती असलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी करविर पिठाचे शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंहभारती होते. 
 
तालुक्यातील आडगाव येथील मनुदेवी रस्त्यावरील संत कुटियामध्ये २८ जानेवारीपासून १०८ कुंडी शिवशक्ती सहस्त्रनाम महायज्ञ सप्ताह सुरू होता. शनिवारी धर्मसभेने या सप्ताहाची सांगता झाली. या सोहळ्यास देशाच्या विविध भागातील साधू-संतांसह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. धर्मसभेत संवाद साधताना साध्वी डॉ. प्राची दीदी यांनी हिंदू धर्म संस्कृती याविषयावर विश्लेषणात्मक माहिती दिली. हिंदू धर्मावर होत असलेल्या टीकेचा त्यांनी कडक शब्दात समाचार घेतला. 
 
हिंदू धर्म अतिशय प्राचीन असल्याचे सांगत प्रभु श्रीराम या धर्मियांचे आद्यदैवत असल्याचे त्या म्हणाल्या. तरीही श्रीराम त्यांच्या जन्मभूमीवरच प्रश्न निर्माण करण्यात येतो. सरकारने राम जन्मभूमीचा विषय निवडणूक मुद्या करू नये. त्याऐवजी समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी साध्वी डॉ.प्राची यांनी केली.
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...