आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: जंगलात नेत पाचवर्षीय बालिकेवर बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शिंदखेडा तालुक्यातील चावळदे गावातून रात्रीच्या वेळी बालिकेला पळवून नेत तिच्यावर वनहद्दीत बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्जुन मालचे याच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शिंदखेडा तालुक्यातील चावळदे येथे पीडित मुलीचे कुटुंब वास्तव्यास आहे. तिचे वडील सालदारकी करतात. काल रविवारी सायंकाळी पाच वर्षाची बालिका गावातील मानसिंग गिरासे यांच्या दुकानाजवळ अंगणात खेळत होती. या वेळी जवळच असलेल्या वडदे गावातील अर्जुन सुभाष मालचे हा आला. खेळण्यात दंग असलेल्या या बालिकेला खांद्यावर नेत त्याने जंगलाकडे पळ काढला. त्यानंतर अर्जुनने बालिकेवर बलात्कार केला. रविवारी रात्री आठ ते साडेदहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर ग्रामस्थांनी मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर जंगलात पीडित बालिका अर्जुन मिळून आला. या वेळी अर्जुन हा मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात पोलिसांना कळविण्यात आल्यामुळे काही वेळातच दोंडाईचा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक संतोष इंगळे, अनिल मराठे, अनिल पाटील, सोनवणे आदी दाखल झाले. त्यांनी अर्जुनला अटक केली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्जुनविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या अर्जुनला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शुक्रवार (दि.२१) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

वैद्यकीय तपासणी 
- पीडित बालिकेला सोमवारी सकाळी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. तेथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. अर्जुनचीही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
-संतोषइंगळे, सहायक पोलिस निरीक्षक 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...