आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावेरमध्ये आत्महत्येच्या दोन घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर - तालुक्यातील वेगवेगळ्या घटनेत रावेर आणि अटवाडे येथील दोघांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत रावेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
रावेर येथील मानकर प्लॉट भागातील रहिवासी महेश दत्तात्रय पाटील (वय ३०) याने राहत्या घरी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. महेशचे शहरातील लाल बहादूरशास्त्री चौकात मेडिकल स्टोअर्स असून तो विटवे येथील रहिवासी आहे. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील अटवाडे येथील राजेंद्र पांडुरंग पाटील (वय ४५) यांनी खानापूरजवळील उड्डाण पुलाजवळ रेल्वेच्या डाऊन लाइनवर आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना झाली. मनोहर पाटील यांच्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...