आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळा शहरात पुनर्जन्माचा दावा, ओम शांती केंद्राची पुष्टी; अंनिसला आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिकेय सोबत खासदार ए.टी.पाटील, शिवप्रताप सिंग, नीलम सिंग, संध्या दीदी. - Divya Marathi
कार्तिकेय सोबत खासदार ए.टी.पाटील, शिवप्रताप सिंग, नीलम सिंग, संध्या दीदी.
पारोळा- शहरातील रिक्षाचालक ओम शांती केंद्राचे सदस्य अनिल चौधरी यांचा दिवंगत भाऊ सुनील चौधरी याचा मृत्यू आठ वर्षांपूर्वी झाला आहे. त्याचा पुनर्जन्म उत्तर प्रदेशातील मिर्झापूर गावात एका बालकाच्या रूपात झाल्याचा दावा माऊंटअाबू पारोळा येथील ओम शांती केंद्राच्या प्रमुखांनी केला अाहे.

या बालकाने त्याच्या मिर्झापूर येथील पालकांना पारोळ्यात येण्यास भाग पाडले. पारोळ्यात आल्यानंतर त्याने आई-भावानंतर बहिणीला ओळखले. या बालकाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, पुनर्जन्म हा वादग्रस्त विषय असून यास शास्त्रीय पुरावा नाही. आता हा प्रकार कितपत खरा समजावा? हा प्रश्न अाहे. त्यामुळे आता यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

याबाबत पारोळा येथील ओम शांती केंद्राच्या प्रमुख संध्या दीदी सदस्य अनिल चौधरी यांनी सांगितले की, सुनील हा १७व्या वर्षी पारोळा येथून माऊंटआबूमधील ओम शांती केंद्रात सेवेकरी झाला. बांधकामाची आवड असल्याने तो तेथील केंद्राच्या इमारतीच्या कामात सहभागी व्हायचा.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसा झाला होता मृत्यू... कोठे झालाय पुनरजन्म...
बातम्या आणखी आहेत...