आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिमिक्स गाण्यावर ज्येष्ठ महिलांचा ठेका, पंजाबी, कालबेलिया, गाेंधळवर बहारदार नृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव जिल्हा महिला असाेसिएशन नवीपेठ महिला मंडळातर्फे गुरुवारी कांताई सभागृहात लाेकनृत्य स्पर्धा झाली. यात महिलांनी पंजाबी, कालबेलिया, गाेंधळ नृत्य प्रकारात बहारदारपणे नृत्य सादर केले. माहेश्वरी महिला मंडळाच्या वयाची ५० शी पार केलेल्या महिलांनी रिमिक्स गीतांवर बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांना थक्क केले. तरुणींना लाजवेल असा उत्साह त्यांचा हाेता. 
 
महिला दिनानिमित्त गुरुवारी कांताई सभागृहात लाेकनृत्य स्पर्धा घेण्यात अाली. यात शहरातील विविध महिला मंडळाच्या सदस्या माेठ्या उत्साहाने सहभागी झाल्या हाेत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, राजकमल पाटील, अाशा सपकाळे, कमल पाटील, ज्याेती जाेशी, ऊर्मिला झंवर, राजी नायर, नीलकमल टाक, शारदा साेनवणे, मीना जाेशी उपस्थित हाेत्या. बक्षीस वितरण प्रसंगी पीपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, पुष्पा पाटील, फारुख शेख उपस्थित हाेते. स्पर्धेचे परीक्षण अॅड. महिमा मिश्रा, अजय शिंदे, विकास जाेशी, ज्याेती श्रीवास्तव यांनी केले. शीला पांडे, वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. लाेकनृत्य स्पर्धेसाठी अामदार सुरेश भाेळे यांचे विशेष सहकार्य मिळाले. 
 
स्पर्धेत महिलांनी पारंपरिक वेशभूषा करीत अाकर्षक नृत्याचे सादरीकरण केले. सुवर्णकार महिला मंडळाने ‘खंडेराया बानुबया’, गणगाैर महिला मंडळाने ‘गाेंधळ मांडला’, जय मल्हार ग्रुपने ‘रुसला का मजवरी मल्हारी’, वनिता विश्व मंडळाने ‘गाेंधळ’, माहेश्वरी मंडळाने ‘अप्सरा अाली’, ‘ज्वालीच्या अागीची मशाल हाती...’, ‘हिचकी’ यासारख्या लावणीवर बहारदार नृत्य केले. अादर्शनगर महिला मंडळाने पंजाबी गीताद्वारे रंगत अाणली. 
 
बहुभाषिक ब्राह्मण महिला मंडळाने कालबेलिया पारंपरिक गीत सादर करीत उपस्थितांना थक्क केले. श्रावणी ग्रुप, मैढ क्षत्रीय मंडळ, अरिहंत सखी, माहेश्वरी सखी, सहजयाेग ध्यान केंद्र यांनीदेखील नृत्य सादर केले. माहेश्वरी महिला मंडळाच्या ५० शी पार महिलांनी रिमिक्स गीतांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांना थक्क केले. तसेच महिलांनी नृत्य सादर करताना सायकल, हातगाडी मंचावर अाणत अापल्या नृत्याला वेगळेपण दिले. त्या उपस्थित महिलांनी भरभरून दाद दिली. 
 
जळगाव जिल्हा महिला असाेसिएशन नवीपेठ महिला मंडळाच्या लाेकनृत्य स्पर्धेत ‘खंडेराया बानुबया’ या गाण्यावर नृत्य सादर करतांना सुवर्णकार महिला मंडळाचा संघ. तर दुसऱ्या छायाचित्रात कार्यक्रमास उपस्थित महिला. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, ज्येष्ठ महिलांचा नृत्याची फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...