आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ पालिकेतील रिक्त जागांवर मार्चनंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेतील अपूर्ण मनुष्यबळावर तोडगा काढत सत्ताधारी भाजपने आता रिक्त जागांवर सेवा करार पध्दतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूका देण्याचे नियोजन केले आहे. तीन प्रमुख पदांसाठी पालिकेकडे आठ अर्ज आले असून काही सेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारीही सेवा करारावर काम करण्यास इच्छुक आहेत. यामुळे सुपेरिअर कर्मचाऱ्यांच्या अभावाने अडलेला पालिकेचा गाडा पुन्हा रुळावर येण्याची आशा आहे.
 
साधारण मार्च महिन्यानंतर पालिकेतील तिन्ही प्रमुख पदांवर ही भरती केली जाईल. 
स्थापत्य अभियंता, लेखाधिकारी आणि अस्थापना अधिकारी या महत्वाच्या तिन्ही पदांवर यापध्दतीने सेवानिवृत्तांना सेवा करारानुसार संधी दिली जाणार आहे. या संदर्भात पालिकेने जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जाहिरात प्रसिध्द केली होती. यात तिन्ही पदांवर सेवा कराराने काम करण्यास इच्छुक असलेल्या आठ जणांनी अर्ज केले आहेत. मार्च नंतर ही भरती प्रक्रिया केली जाणार असल्याने पालिकेतील सुपेरिअर स्टाफ वाढून पालिकेचा रखडलेला गाडा रुळावर येण्याची शक्यता आहे. पालिका आणि प्रभारी राज हे समिकरणच झाले आहे. तब्बल ६० टक्के सुपेरिअर स्टाफ कमी असल्याने पालिकेच्या सर्वच विकासात्मक कामांमध्ये अडथळे येतात. शासनाकडून निधी आणि अनुदान मिळते, विविध योजनांमध्ये शहराचा समावेश होतो मात्र केवळ कर्मचारी कमी नसल्याने शासकीय योजनांचा पाठपुरावा होत नाही. यामुळे शहरात गेल्या काळात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले. मात्र गेल्या काळातील अडचणी आता निर्माण होऊ नयेत, म्हणून पालिकेतील सत्ताधारी भाजपने पालिकेतील महत्वाच्या पदांवर निवृत्तांची नियुक्ती करण्याचे नियोजन केले आहे. 
 
सर्वात उत्तम पर्याय 
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सेवा करारावर विविध कामांसाठी सेवानिवृत्तांची नियुक्ती करता येते. पालिका प्रशासनाला भरतीची परवानगी मिळत नाही तर अस्थायी पदावर कोणी येण्यास तयार नाही. यामुळे पालिकेने हा उत्तम सर्वांत सोपा पर्याय निवडला आहे. या प्रकारे तज्ज्ञांची नियुक्ती करता येईल. यामुळे अास्थापन, स्थापत्य आणि लेखा विभागातील प्रश्न सुटतील. कायम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठीही पालिका प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. 
 
अस्थायीसाठी प्रयत्न 
पालिकेतील सत्तांतरानंतर कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. कमी कर्मचाऱ्यांमध्येही समाधानकारक काम होते. मात्र, कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरण्यासाठी सेवा करारावर कर्मचारी नियुक्तीसह अस्थायी पदांवरही शासनाच्या माध्यमातून कर्मचारी घेऊन मनुष्यबळ वाढवले जाईल. मनुष्यबळवाढीशिवाय पुढील कोणतीही विकासकामे करणे अशक्य असल्याने आगामी काळात कर्मचारी भरतीची प्रक्रियाही राबवू. रमणभोळे, नगराध्यक्ष, भुसावळ 
बातम्या आणखी आहेत...