आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव: मद्यधुंद चालकाचा ताबा सुटला अन् वऱ्हाडाचे वाहन कलंडले, २४ जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव तालुक्यातील देवळी नाल्यावर कलंडलेल्या वाहनाजवळ मदत कार्यासाठी धावून अालेले नागरिक. - Divya Marathi
चाळीसगाव तालुक्यातील देवळी नाल्यावर कलंडलेल्या वाहनाजवळ मदत कार्यासाठी धावून अालेले नागरिक.
चाळीसगाव- नांदगाव तालुक्यातील उपखेड-साकाेरा येथून विवाह समारंभ अाटाेपून परतीच्या प्रवासाला निघालेल्या निंभाेरा (ता. धरणगाव) येथील वऱ्हाडाच्या खासगी वाहनाला (मिनी बस) अपघात हाेऊन २४ प्रवासी जखमी झाले. यात दाेघांची प्रकृती खालावल्याने त्यांना धुळे सामान्य रुग्णालयात हलवण्यात अाले. हा अपघात रविवारी दुपारी ३.३० वाजता देवळी नाल्यावर (ता. चाळीसगाव) झाला. 

चालकाने मद्यसेवन केले हाेते, असे जखमी प्रवाशांनी सांगितले. अपघातस्थळी रडण्याचा अावाज एेकून अाजूबाजूची मंडळी तसेच वाहनधारक मदतीसाठी धावले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. निंभोरा (ता. धरणगाव) येथील बळवंत पाटील यांच्या मुलीचे लग्न नांदगाव तालुक्यातील उपखेडच्या मुलाशी होते. दुपारी लग्न सोहळा आटोपून वऱ्हाडी मंडळींना घेऊन एमएच- १९, व्ही- ७५०० ही मिनी बस दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास धरणगावकडे निघाली. आडगाव ते देवळीदरम्यान नाल्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने मिनी बस नाल्यात पडली. 

जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर, डॉ. वैदेही करंबळेकर, डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. बडगुजर, डॉ. किशोर जाधव, डॉ. सैयद, संगीता बागुल, सुलभा जोशी, श्रीमती महाजन, प्रकाश सैंदाणे, पुष्पा महाजन यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे खासगी रुग्णालयात दाखल केले. 

नगरसेवक मानसिंग राजपूत, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, बापू आहिरे, रामचंद्र जाधव यांच्यासह अनिल गहिणे, छोटू राजपूत, भरत पाटील, विशाल कारडा, दीपक राजपूत यांच्यासह सर्वसामान्य नागरिक अपघातस्थळी मदतीसाठी तत्काळ धावून अाले. 

अपघातातील जखमींची नावे अशी 
स्वप्निल समाधान सोनवणे (वय १७), भगवान प्रकाश पाटील (वय २०), जनार्दन तापीराम कोळी (वय ६५), रतीलाल दशरथ पाटील (वय ६०), रोहिदास जगन्नाथ पाटील (वय ५०), रामचंद्र भागवत पाटील (वय ५०), प्रदीप चैत्राम पाटील (वय ३८), शिवदास निंबा पाटील (वय ३५), ज्ञानेश्वर आत्माराम सोनवणे (वय ३५), योगेश मोतीलाल पाटील (वय ५), राजेंद्र रामदास पाटील (वय २८), मुरलीधर कृष्णा पाटील (वय ३०), अशोक जिजाबराव पाटील (वय ४०), शिवाजी शालिग्राम पाटील (वय ५०), धर्मा खंडू पाटील (वय ६०), समाधान रोहिदास सोनवणे (वय २४), भालेराव परशुराम सोनवणे (वय ७०), दिलीप श्रीराम पाटील (वय ४२), संजय भगवान पाटील (वय ४५), लोटन वामन पाटील (वय ६०), अशोक हिरामण पाटील (वय ४५), प्रमोद प्रताप पाटील (वय ३५) सर्व रा. निंभोरा चेतन संजय पाटील (वय १७, रा. जळगाव), अश्फाक (वय ५५, रा. वर्डी) असे २४ जण गंभीर जखमी झाले अाहेत. 

खासगी डाॅक्टरांची मदत मिळेना 
ग्रामीण रुग्णालयात जखमींचा अाक्राेश सुरू हाेता. फक्त चार सरकारी डाॅक्टर चार कर्मचाऱ्यांचे हात उपचारासाठी कमी पडत हाेते. एकाच बेडवर दाेन-दाेन जखमी उपचाराच्या प्रतीक्षेत हाेेते. या कामासाठी काही नागरिकांनी सरकारी डाॅक्टरांना हातभार लावला. शहरातील एकही खासगी डाॅक्टर मदतीसाठी सरकारी दवाखान्यात फिरकलाही नाही. वास्तविक साेशल मीडियातून इलेक्ट्राॅनिक प्रसार माध्यमांतून अपघाताची बातमी सर्वांपर्यंत पाेहाेचली हाेती, असे असताना एकही खासगी डाॅक्टर मदतीसाठी दाखल झाला नाही. यापूर्वीच्या अशाच दाेन माेठ्या अपघातांवेळीही खासगी डाॅक्टरांबाबत हाच अनुभव अाल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटला. 
बातम्या आणखी आहेत...