आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डंपरने युवकाला उडवले, युवक जखमी, गुण्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हीच ती गाडी. - Divya Marathi
हीच ती गाडी.
जळगाव- शिवाजीनगरातील कानळद्याकडे जाणाऱ्या १०० फुटी रस्त्याच्या वळणावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता डंपरने माेटारसायकलवरील युवकाला उडवले. सुदैवाने युवक लांब जाऊन पडल्याने किरकाेळ जखमी झाला. याप्रकरणी शहरात पाेलिस ठाण्यात माेटार अपघाताची नाेंद करण्यात अाली अाहे.
शिवाजीनगरातील १०० फुटी रस्त्यावरून गॅरेजवर काम करणारा फैजल खान हारून खान (वय १५, रा. शिवाजीनगर) हा माेटारसायकल (क्र.एमएच- १९, बीसी- ७८७२)ने बुधवारी सकाळी १०.३० वाजता एसएमअायटी काॅलेज रस्त्यावरील एमकेबी या गॅरेजवर घेऊन चालला हाेता. कानळद्याकडून येणाऱ्या १०० फुटी रस्त्यावरून ताे दूध फेडरेशनच्या वळणावर समाेरून येणाऱ्या रिकाम्या डंपर (क्र.एमएच- १९, झेड- ९९९२) त्याला उडवले. सुदैवाने फैजल लांब जाऊन पडला. त्यामुळे त्याला किरकाेळ दुखापत झाली; मात्र माेटारसायकलचे नुकसान झाले. माेटारसायकल मालक बाळू अाधार पाटील यांना डंपर मालकाने नुकसान भरपाई दिली. मात्र, सहायक पाेलिस निरिक्षक अाशिष राेही यांच्या फिर्यादीवरून शहर पाेलिस ठाण्यात अपघाताची नाेंद करण्यात अाली अाहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आपघाताचा अंगावर शहारा आणणारा फोटो...
बातम्या आणखी आहेत...