आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैपदरीकरणाचे काम सुरू करताच नागरिकांचा संताप; चार तास ठिय्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - नऊ दिवसांपासून महामार्गाचे चाैपदरीकरण बंद हाेते. ठप्प झालेले काम ठेकेदाराने सुरू केले. मात्र, याची माहिती मिळताच शुक्रवारी नागरिकांचा माेठा उद्रेक झाला. त्यांनी काम पुन्हा बंद पाडले. त्याचबराेबर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमाेरच तब्बल चार तास ठिय्या दिला. समन्यायी पद्धतीने संपादित जमिनीचा चारपट मोबदला मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नाही, असा निर्धार या नागरिकांनी केला अाहे. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश अाहे. त्यांनी वाढीव माेबदल्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी केली अाहे. या भूमिकेमुळे आता चौपदरीकरणाच्या कामाला माेठा ब्रेक लागणार आहे. 
 
सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण सुरू झाले; पण संपादित जमिनीचा मोबदला देताना काही जणांना जुन्या कायद्यानुसार एकपट, तर काहींना भूसंपादन कायद्यानुसार चारपट मोबदला देण्यात आला. एकाच गावशिवारात दाेन प्रकारचे दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. नवापूरपासून ते अजंगपर्यंत एकसमान पद्धतीने चारपट मोबदला मिळावा, अशी मागणी हाेत अाहे. यासाठी दि. २४ मार्चला शेतकऱ्यांनी नवापूर ते अजंग अशा १४० किलोमीटर परिसरातील काम बंद पाडले हाेते. यानंतर महिनाभरात मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या अनुषंगाने शेतकऱ्यांनी २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत विचारणा केली. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्वांना एकसमान पद्धतीने मोबदला देण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांनी २६ एप्रिलपासून महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या-त्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडले. नऊ दिवसांपर्यंत चौपदरीकरणाचे काम ठप्पच राहिले. आता पावसाळा जवळ येत अाहे. चौपदरीकरणाचे महत्त्वाचे काम करता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे गुरुवारी जीएचव्ही कंपनीच्या ठेकेदाराने काही ठिकाणी काम सुरू केले. या कामात शेतकऱ्यांनी अडथळे आणू नयेत म्हणून स्थानिक रखवालदार नियुक्त केले. मात्र, काम सुरू झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सरळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठत सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला. या आंदोलनाची तीव्रता विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अरविंद काळे, अायएफएसएलचे अधिकारी कमलापती तसेच जीएचव्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. {या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकरी कंपनी प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या वेळी शेतकरी जोपर्यंत वाढीव मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरूच होऊ देणार नाहीत यावर ठाम राहिले. तसेच जर जोरजबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाच तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा इशारादेखील दिला. या वेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुवर्णमध्य साधत तूर्त अवघड ठिकाणची कामे सुरू ठेवण्याचे तसेच इतर ठिकाणी काम बंद करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनामुळे प्रशासनानेदेखील नमती भूमिका घेतली आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे चौपदरीकरणाच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून होत असलेल्या टोलवाटोलवीमुळे व्यथित झालेले शेतकरी न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत अाहेत. यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी मार्गदर्शन घेतले जात अाहे. तसे झाले तर चाैपदरीकरणाच्या कामाला माेंा ब्रेक लागू शकताे. 

दिल्लीलापाठविणार प्रस्ताव 
जिल्हाप्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्ली कार्यालयात वाढीव मोबदल्यासाठी फेरप्रस्ताव पाठविणार अाहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे सदस्यही दिल्ली गाठणार आहेत. 

याशेतकऱ्यांची राहिली उपस्थिती 
याआंदोलनास संग्राम पाटील, प्रकाश परदेशी, रामलाल परदेशी, अनिल रायते, रमेश माळी, शांताबाई परदेशी, प्रभाकर शिंदे, संजय शिंदे, चंद्रकांत चौधरी, सतीश बोढे, सोमनाथ भोई, फकिरा चौधरी यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित हाेते. 
 
जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार 
प्राधिकरणसर्व शेतकऱ्यांना चारपट मोबदला देण्यास तयार नाही. ज्या जमिनी २०१३पूर्वी अवाॅर्ड झाल्या, त्यांना जुन्याच दराने मोबदला देण्यावर प्राधिकरण ठाम आहे. वाढीव मोबदल्याच्या प्रस्तावाचा निपटारा करण्यास जिल्हाधिकारी या सक्षम प्राधिकरणाकडे अपील दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे. 

न्यायालयात जाण्याची तयारी... 
^जोपर्यंतशेतकऱ्यांनावाढीव मोबदल्याची रक्कम प्राप्त होणार नाही तोपर्यंत काम करू देणार नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातदेखील चर्चा झाली आहे. आता पुढे दिल्ली कार्यालयात तसेच न्यायालयात जाऊन पाठपुरावा करण्याचा समितीचा निर्णय आहे. -संग्रामपाटील, शेतकरी संघर्ष समिती 

प्रशासनाला दिले पत्र.... 
^शेतकऱ्यांच्या मागणीवर वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव सादर केला आहे. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयात पुन्हा फेरप्रस्ताव सादर करण्यात येईल. पावसाळ्यात ज्या अवघड ठिकाणी कामे करणे शक्य होणार नाही, ती कामे सुरू करू देण्याची विनंती केली आहे. तसेच जिल्हाधिकारी पोलिस प्रशासनाला पत्र दिले . -अरविंदकाळे, प्रकल्प अधिकारी, महामार्ग प्राधिकरण 

असा आहे घटनाक्रम 
}वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी मार्चला आंदाेलनाचा इशारा दिला. 
} २४ मार्चला झाले प्रत्यक्ष ‘काम बंद’. 
} २४ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांची भेट 
} २५ एप्रिलपासून पुन्हा ‘काम बंद’ आंदोलन. 
} मे रोजी काही ठिकाणी काम सुरू. 
} मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठिय्या. 
} १०० ते ५०० रुपये चौरसमीटर आहेत एकपट दर. 
} हजार ते हजार रुपये चौरसमीटर आहेत चारपटचे दर. 
बातम्या आणखी आहेत...