आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायडीबीअायच्या एटीएममधून तरुणाचे १८ हजार रुपये लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- माेबाइलवर एटीएमचा पासवर्ड विचारून भामट्याने भिस्तीवाड्यातील तरुणाच्या अादर्शनगरातील अायडीबीअाय बँकेच्या खात्यातील १८ हजार रुपये लांबवले अाहे. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली.

भिस्तीवाड्यातील बाबा शेख बशीर (वय ३०) हा लग्नसमारंभात मांडे (माेठ्या पाेळ्या) बनवण्याचे काम करताे. या व्यवसायातून कमवलेले पैसे ठेवण्यासाठी त्याने अादर्शनगरातील अायडीबीअाय बँकेत खाते उघडले हाेते. बुधवारी सकाळी ११ वाजता त्याच्या माेबाइलवर बँकेचा अधिकारी बाेलताे म्हणून एका भामट्याचा फाेन अाला. त्या वेळी त्याने खाते अपडेट करायचे असल्याचे सांगून ते केले नाही, तर खाते बंद करण्याची धमकी दिली. तसेच खात्यातील पैसे मिळणार नसल्याची भीती भामट्याने बाबा बशीर याला घातली. बाबा घाबरल्याचे पाहून त्या भामट्याने एटीएमचा पासवर्ड अाणि कार्डवरच्या क्रमांकाची मागणी केली. घाबरलेल्या बाबा बशीरने ती सर्व माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटांतच त्याच्या माेबाइलवर पैसे काढल्याचा एसएमएस अाला. त्यामुळे बाबा बशीर याला मोठा धक्का बसला.

बँकेत चौकशी अन् तक्रार
एसएमएसआल्यानंतर बाबा बशीरने तत्काळ खान्देश मिल कॉम्प्लेक्समधील अायडीबीअाय बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन बघितले. त्या वेेळी त्याच्या खात्यातील त्याने जमा केलेले १८ हजार रुपये त्या भामट्याने लांबवले हाेते. यासंदर्भात त्याने बँकेच्या व्यवस्थापकांना तक्रार दिली. त्यानंतर ताे शहर पाेलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला. तेथून त्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली अाहे. त्याच्या खात्यातून अाॅनलाइन खरेदी झाल्याचे अाढळून अाले अाहे.