आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ-बहिणीच्या मृत्यूनंतर ‘अारटीअाे’कडून रात्री 10ला सात ट्रॅव्हलची तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तपासणीसाठी अारटीअाे कार्यालयात अाणलेली ट्रॅव्हल्स. - Divya Marathi
तपासणीसाठी अारटीअाे कार्यालयात अाणलेली ट्रॅव्हल्स.
जळगाव - धावत्या ट्रॅव्हल्सचा पत्रा प्लायवूड तुटून चाकाखाली येऊन मन्यारखेडा येथील भाऊ-बहिण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेनंतर ट्रॅव्हल्सच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन साेमवारी माजी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी अपघातग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन संबंधित ट्रॅव्हल्स मालकावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अाश्वासन दिले. तसेच ज्यांच्यावर ट्रॅव्हल्सच्या गुणवत्ता तपासणीची जबाबदारी अाहे, त्या अारटीअाे कार्यालयाने साेमवारी दिवसभर शहरातील एकही खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी केली नाही. मात्री रात्री १० वाजता सात ट्रॅव्हलची तपासणी केली. यात नियमबाह्य सात खासगी ट्रॅव्हल्सचे परवाने ताब्यात घेतले आहेत. तर एक ट्रॅव्हल्स प्रवाशंासह तपासणीसाठी आरटीओ कार्यालयात आणली होती. चालकाने सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतर रात्री १०.३० वाजता ट्रॅव्हल्स सोडून दिले. 
 
पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्सने जळगावला येणाऱ्या अरुणा सुरेश मराठे गजानन सुरेश मराठे या दाेघ भाऊ-बहिणीचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला. अतिशय भयानक अशा अपघातामुळे अनेकांना भाेवळ अाली. सहजपणे गाडीचा पतरा प्लायवूड तुटून अपघात हाेण्याची ही पहिलीच घटना अाहे. ट्रॅव्हल्स मालकाच्या निष्काळजीपणाचे हे लक्षण असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे कशा खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवाशांना प्रवास करावा लागताे हे समाेर अाले अाहे; पण तरीदेखील प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. एवढेच नव्हे तर ट्रॅव्हल्सच्या मालकाविरोधात ठोस कारवाई देखील झालेली नाही. वास्तविक या घटनेनंतर जळगावातील अारटीअाे विभागातर्फे तत्काळ गुणवत्तेची तपासणी करायला हवी हाेती. परंतु साेमवारी अारटीअाे विभागातर्फे ते साेपस्कार पूर्ण करण्यात अाले नसल्याने संताप व्यक्त केला जात अाहे. 
 
देवकरकरणार पाठपुरावा 
सोमवारी माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर यांनी मन्यारखेडा येथे जाऊन मराठे कुटुंबीयांची भेट घेतली. ट्रॅव्हल्स मालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडला अाहे. गुणवत्ता नसलेल्या ट्रॅव्हल्स लांब पल्ल्याच्या मार्गावर धावण्यापूर्वी परिवहन विभागाने त्यांना मंजुरी कशी दिली? याचा जाब आपण यंत्रणेला विचारणार आहाेत. तसेच या अपघातात दोषी आढळून येणाऱ्या ट्रॅव्हल्स मालक, चालक यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून पाठपुरावा करणार असेे अाश्वासन देवकर यांनी दिले. 
 
शासनाकडे न्याय मागणार 
- ट्रॅव्हल्स मालकाने गुणवत्ता नसलेल्या गाडीतून प्रवासी वाहतूक केल्यामुळेच हा अपघात झाला आहे. यात आमच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी म्हणून आम्ही शासनाकडे न्याय मागणार आहाेत.
आनंदामराठे, मयत गजाननचे मोठे भाऊ 
 
अचानकपणेतपासणी करू 
- शनिवारी घडलेल्याअपघाताची माहिती घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात नोंदणी असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सची अचानक तपासणी करण्यात येईल. यात कुणी दोषी अाढळले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
जयंतपाटील, अारटीअाे 
 
या खासगी बसेसचे परवाने घेतले ताब्यात 
एमएच- १६ बीसी- ००४५, एमएच- १२ एफसी- ३५४७, एमएच- १६ टी- १८१८, एमएच- २० सीटी- ३२३७, एमएच- १६ क्यू- ९९७६, एमएच- २० डीडी- ५२४, एमएच- १२ एचबी- ७५१. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, एसी बंद, ज्यादा प्रवाशांची ओरड नेहमीचीच.... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...